Home » राज्य » शेत शिवार » आले पिकाच्या अधिक उत्पादनासाठी ९ सप्टेंबरला शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण

आले पिकाच्या अधिक उत्पादनासाठी ९ सप्टेंबरला शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण

आले पिकाच्या अधिक उत्पादनासाठी ९ सप्टेंबरला शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण

सातारा – महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत आले पिकाच्या आधुनिक तंत्रज्ञानाबाबत विशेष प्रशिक्षण कार्यक्रम दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता, सोनगाव तर्फ सातारा, येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.

या प्रशिक्षणामध्ये आले पिकाविषयी एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, आले पीक उत्पादन वाढ ते आले प्रक्रिया व मुल्यवर्धन तसेच आले पिकातील विविध टप्प्यामधील भर नियोजन व मशिनरी प्रात्यक्षिक या तांत्रिक बाबीवर सखोल मार्गदर्शन या बरोबर बायोमिक्स, ट्रायकोडर्मा, सोलर लाइट ट्रॅप, पिवळे निळे चिकट सापळे इ. विषयी उपस्थित शेतक-यांना विशेष तज्ञांकडुन व प्रगतीशील शेतकऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 

सातारा जिल्ह्यात आले पीक लागवड करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सदर प्रशिक्षणास उपस्थित राहून तज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन सातारा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

पुण्यातील प्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ प्रत्येक सोमवारी साताऱ्यात 

पुण्यातील प्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ प्रत्येक सोमवारी साताऱ्यात  सातारा : हाता-पायांना मुंग्या, झोप न लागणे, डोके दुखी, चक्कर, हालचालींचा मंदपणा, आकडी

Live Cricket