विशेष मतदार यादी निरीक्षक शितल तेली उगले यांचा सातारा दौरा मतदान केंद्रांची पाहणी आणि बैठकांचे आयोजन

सातारा : भारत निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार विशेष सखोल पुनरीक्षण-२०२६ अंतर्गत ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सातारा जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या प्रारुप मतदारयाद्या भारत निवडणूक आयोगाचे मतदार सेवा पोर्टल https://voters.eci.gov.in मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे संकेतस्थळ https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo तसेच सातारा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळ https://www.satara.gov.in वर नागरिकांसाठी उपलब्ध आहेत.
या पार्श्वभूमीवर दावे व हरकती स्वीकारण्याच्या टप्प्यात सातारा जिल्ह्यासाठी मतदार यादी निरीक्षक तथा पुणे विभागाच्या आयुक्त शितल तेली उगले यांचा ९ सप्टेंबर रोजी प्रथम भेट जिल्हा दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या दौऱ्यादरम्यान विविध मतदान केंद्रांची पाहणी करून बीएलओ व मतदारांशी संवाद साधणार आहेत, तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठका घेणार आहेत. प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने तसेच दावे व हरकतींबाबत काही तक्रारी किंवा शंका असल्यास नागरिकांनी व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी त्या निरीक्षकांच्या दौरा कार्यक्रमाच्या ठिकाणी मांडाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, सातारा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
दौऱ्याचे प्रमुख कार्यक्रम पुढीलप्रमाणे: ३.३० ते ३.५० वा.कराड: इआरओ कराड उत्तर व कराड दक्षिण यांच्यासमवेत आढावा बैठक.
३.५० ते ४.१० वा. उंब्रज: मतदान केंद्र २३० (कन्या विद्यालय) व २३६ (जि. प. शाळा उंब्रज) ची पाहणी, बीएलओ व मतदारांशी चर्चा. ४.१० ते ४.३० वा. अतित: मतदान केंद्र ४० व ४३ (जि. प. शाळा अतित) ची पाहणी.
४.३० ते ५.२५ वा. सातारा
जिल्हाधिकारी कार्यालयात विद्यमान खासदार, आमदार आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक. ५.२५ ते ६ वा. पाचवड:: मतदान केंद्र ३१२, ३१३, ३१४ (जि. प. व महात्मा गांधी विद्यालय पाचवड) मतदान केंद्र पाहणी. बी एल ओ व मतदारांशी चर्चा. ६ ते ६.३० वा.
इआरओ वाई कार्यालयास भेट व एसआयआर पाहणी व आढावा. ६.३० ते ७.१0 पारगाव (ता. खंडाळा)मतदान केंद्र ११४ व ११५ (जि. प. शाळा पारगाव) येथे भेट देऊन पाहणी व मतदारांशी चर्चा. व तेथून पुढे पुण्याकडे प्रयाण.
000




