Home » राज्य » प्रशासकीय » सातारा विधानसभा मतदार संघाची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध

सातारा विधानसभा मतदार संघाची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध

सातारा विधानसभा मतदार संघाची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध

सातारा, दि.2 : मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सातारा तहसिल कार्यालय सातारा व जावली, नगरपालिका सातारा, नगरपंचायत मेढा, गटविकास अधिकारी पंचायत समिती सातारा व जावली आणि सर्व मतदान केंद्रांवर मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून मतदारांचे दावे व हरकती असल्यास ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत प्रारूप मतदार यादीवर दाखल करावे.

नोटीस टप्पा व दावे-हरकती २९ ऑक्टोंबर २०२६ निकाली काढण्यात येणार असून अंतिम मतदार यादीची ४ नोव्हेंबर २०२६ प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ज्या मतदारांच्या नोंदीमध्ये ‘No Mapping’ किवा ‘Anomalies’ दर्शविण्यात आल्या आहेत, त्यांची सुनावणी होणार आहे. ज्यांना नवीन नाव नोंदवायचे आहे, तसेच पात्र नागरिक जो २०२६ मध्ये त्यानंतरच्या कोणत्याही पात्रता तारखांना, म्हणजे ०१/१०/२०२६ रोजी १८ वर्षे वयाची पूर्ण करणार आहे, अशा नवमतदारांनी प्रारूप मतदार यादी प्रसिध्दीच्या तारखेपासून फॉर्म ६ मध्ये मतदार यादीमध्ये त्याचे किंवा तिचे नाव समाविष्ट करण्यासाठी त्याचा किंवा तिचा दावा देखील दाखल करू शकतात. 

प्रारूप मतदार यादीतील दाखल नावावर आक्षेप नोंदवायचा आहे, त्यांनी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) किवा निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधून आपली नवीन मतदार नोंदणी दावे व हरकती वरील नमुद तारखांना वेळेत दाखल कराव्यात, असे आवाहनही प्रांताधिकारी आशिष बारकुल व तहसीलदार समीर यादव यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वरच्या पंकज कदम यांचा स्नूकरमध्ये पश्चिम महाराष्ट्र झोन विजेतेपदावर कब्जा

महाबळेश्वरच्या पंकज कदम यांचा स्नूकरमध्ये पश्चिम महाराष्ट्र झोन विजेतेपदावर कब्जा महाबळेश्वर : बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (BSAM) यांच्या

Live Cricket