Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » शासकीय वसतिगृह योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतवाढ

शासकीय वसतिगृह योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतवाढ

शासकीय वसतिगृह योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतवाढ

सातारा : इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राज्यातील महानगरपालिका, विभागीय शहरे आणि जिल्हास्तरावरील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या मान्यताप्राप्त शासकीय, शासन अनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतनांमध्ये प्रवेश घेणाऱ्या इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील १२ वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा इच्छुकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाने केले आहे. 

या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी इयत्ता १२ वी नंतरचे बिगर व्यावसायिक उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना दि. 15 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन पोर्टलवर https://hmas.mahait.org प्रवेश अर्ज भरता येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सातारा यांचे कार्यालयात जमा करावयाची आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करावेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वरच्या पंकज कदम यांचा स्नूकरमध्ये पश्चिम महाराष्ट्र झोन विजेतेपदावर कब्जा

महाबळेश्वरच्या पंकज कदम यांचा स्नूकरमध्ये पश्चिम महाराष्ट्र झोन विजेतेपदावर कब्जा महाबळेश्वर : बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (BSAM) यांच्या

Live Cricket