Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » सातारा जिल्ह्यात खरिप पणन हंगाम २०२६-२७ साठी शेतकरी नोंदणी सुरू सात खरेदी केंद्रांना मान्यता

सातारा जिल्ह्यात खरिप पणन हंगाम २०२६-२७ साठी शेतकरी नोंदणी सुरू सात खरेदी केंद्रांना मान्यता

सातारा जिल्ह्यात खरिप पणन हंगाम २०२६-२७ साठी शेतकरी नोंदणी सुरू सात खरेदी केंद्रांना मान्यता

सातारा:- किमान आधारभूत किंमत खरेदी योजना खरिप पणन हंगाम २०२६-२७ अंतर्गत सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून धान व भरडधान्य (मका/ज्वारी/बाजरी) खरेदी करण्यासाठीची पूर्वतयारी बैठक मा. जिल्हाधिकारी महोदय, सातारा यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या बैठकीतील निर्णयानुसार सातारा जिल्ह्यात १ सप्टेंबर २०२६ पासून ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

भरडधान्य (मका) खरेदीः ०२ केंद्रांवर ४४८ शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून, ३४४ शेतकऱ्यांकडून ९४२७.५० क्विंटल मका खरेदी करण्यात आली व शेतकऱ्यांना २,२६,२६,०००/- रुपये अदा करण्यात आले. नाफेड सोयाबीन खरेदीः ०९ केंद्रांवर ८४२ शेतकरी नोंदणी अंतर्गत, ८१६ शेतकऱ्यांकडून ९७११.०० क्विंटल सोयाबीन खरेदी करून ५,१७,४०, २०८/- रुपये अदा करण्यात आले. नाफेड चना खरेदीः ०९ केंद्रांवर ९० शेतकरी नोंदणी अंतर्गत, ८० शेतकऱ्यांकडून ८७९.०० क्विंटल चना खरेदी करून ५१,६४,१२५/- रुपये अदा करण्यात आले.

मागील हंगामात सुरळीत व विना-तक्रार कार्यरत असलेली २ केंद्रे (फलटण व माण (दहिवडी)) या हंगामातही कायम ठेवण्यात आली असून, शेतकरी वर्गाच्या सोयीसाठी नवीन ५ केंद्रे जोडण्यात आली आहेत. त्यानुसार एकूण ७ केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडेल.

पूर्वीची कार्यरत २ केंद्रेः फलटण व माण (दहिवडी) नवीन मंजूर ५ केंद्रे सातारा, वाई, मसूर, कोरेगाव व कवठे. शेतक-यांनी मुदतीत आपल्या नजीकच्या अधिकृत केंद्रावर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा दानशूर दाम्पत्याकडून विद्यार्थ्यांना भेट, मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला रंगत रांजणी

Live Cricket