महाबळेश्वर तालुक्यात गणेशोत्सव डॉल्बीमुक्त व पारंपरिक वाद्यांच्या गजरात साजरा करा: पोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे यांचे आवाहन. दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या शाहूपुरी शाखेच्या आज २४ व्या वर्धापन दिनानिमित्त सुरसंगम गीत मैफिल कार्यक्रम प्रधानमंत्री जीवनसुरक्षा विमा योजनेचा नलगे कुटुंबाला लाभ- शाम झोरे शालेय जीवनातील जुन्या आठवणींनी भारावले मन ५० वर्षातील विद्यार्थींनी जमल्या एकत्र, लोणंद येथील पवार विद्यालयात स्नेहमेळावा कास पठार हंगाम २०२६चा उत्साहात शुभारंभ खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन; पर्यावरणपूरक पर्यटनाचा संदेश सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी जनहक्क क्रांती मंचचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन;
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » प्रधानमंत्री जीवनसुरक्षा विमा योजनेचा नलगे कुटुंबाला लाभ- शाम झोरे

प्रधानमंत्री जीवनसुरक्षा विमा योजनेचा नलगे कुटुंबाला लाभ- शाम झोरे

प्रधानमंत्री जीवनसुरक्षा विमा योजनेचा नलगे कुटुंबाला लाभ- शाम झोरे

वाई – दि वाई अर्बन को. आँप. बँकेने प्रधानमंत्री जीवनसुरक्षा विमा योजनेतून खातेदारांचे जीवन सुरक्षित केल्यामुळे आरफळ येथील कै. अमर मुगुटराव नलगे यांच्या कुटुंबियांना रूपये दोन लाखांची विमा रक्कम देण्यात येत आहे, अशी माहिती बँकेच्या सातारा विभागाचे सहाय्यक सरव्यवस्थापक शाम झोरे यांनी दिली. 

बँकेच्या आरफळ शाखेतील मृत खातेदाराच्या पत्नी श्रीमती रेश्मा अमर नलगे यांना ग्रामपंचायत सदस्या सौ. पूजा वैभव पवार यांच्या हस्ते विमा रक्कम देणेत आली. याप्रसंगी शाखा समिती सदस्य श्री. ज्ञानेश्वर साबळे, श्री. उमेश पाटील, श्री. विकास पवार, श्री महेश पाटील व ग्रामस्थ खातेदार उपस्थित होते.  

शाम झोरे यांनी प्रधानमंत्री विमा योजनेचे महत्त्व उपस्थितांना सांगितले. आरफळसारख्या छोट्या ग्रामीण भागामध्ये वाई अर्बन बँकिंग सुविधा देत आहे. त्या माध्यमातून सर्व खातेदारांनी भारत सरकारच्या प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजना (वयाच्या 70 वर्षांपर्यंत अपघात) याचा वार्षिक हप्ता रुपये वीस व प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना (वय वर्षे 50 पर्य़ंत जीवन विमा) वार्षिक हप्ता रुपये चारशे छ्त्तीस फक्त या योजनेत सहभागी होऊन आपले व कुटुंबाचे आर्थिक जीवन सुरक्षित करावे, असे आवाहन केले. आरफळ गावातील प्रत्येक कुटुंबाने बँकेत बचत खाते सुरू करून या विमा योजनेत सहभागी होऊन भविष्यातील नैसर्गिक / आकस्मित घटनांवर मात करावी. अल्पशा रकमेचा विमा हप्ता भरून भविष्य सुरूक्षित करता येते. अमर नलगे यांचे दोन महिन्यांपूर्वी अपघाती निधन झाले होते. त्यांनी विमा योजनेत सहभाग घेतल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला थोडा आधार मिळाला आहे. बँकेच्या ठेवी व कर्जाच्या योजनांचा लाभ घेऊन आपला व आपल्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचवावा, असेही श्री. शाम झोरे यांनी सांगितले. शाखाधिकारी श्री महेश जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर तालुक्यात गणेशोत्सव डॉल्बीमुक्त व पारंपरिक वाद्यांच्या गजरात साजरा करा: पोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे यांचे आवाहन.

महाबळेश्वर तालुक्यात गणेशोत्सव डॉल्बीमुक्त व पारंपरिक वाद्यांच्या गजरात साजरा करा: पोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे यांचे आवाहन. ​महाबळेश्वर:गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या तीव्र

Live Cricket