पाचगणीत आज अण्णाभाऊ साठे जयंती; नितीन वन्ने यांचे उपस्थितीचे आवाहन
पाचगणी : महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल व महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल, सातारा जिल्ह्याच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती सोमवारी (दि. ३१ ऑगस्ट) पाचगणी येथे आयोजित करण्यात आली आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक योगदानाचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. या जयंती कार्यक्रमास कामगार सुरक्षा दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सातारा जिल्हाध्यक्ष मा. नितीन वन्ने यांनी केले आहे.
अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा आणि सामाजिक कार्याचा जागर व्हावा, तसेच त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.




