Home » Uncategorized » आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

मेढा (प्रतिनिधी)-आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा येथे शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. भारतीय हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना क्रीडांचे महत्त्व आणि शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर अशोक गिरी यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी प्राचार्य मेजर अशोक गिरी यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडेलाही महत्त्व देणे आवश्यक असल्याचे सांगितले. क्रीडेमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, नेतृत्वगुण, संघभावना आणि खिलाडूवृत्ती विकसित होते, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाची प्रस्तावना शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागप्रमुख डॉ. प्रमोद चव्हाण यांनी केली. त्यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व स्पष्ट करत मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी नियमित व्यायाम व क्रीडा उपक्रमांमध्ये सहभागी होऊन निरोगी जीवनशैली अंगीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच महाविद्यालयातील बहुतेक विद्यार्थ्यांनी विविध खेळाविषयी, शारीरिक तंदुरुस्ती आणि पोलिसाच्या पदाबद्दल चे भित्तीपत्रके तयार करून प्रदर्शन भरवण्यात आला. 

कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. सारंग शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक जागरूकता निर्माण करणारा व प्रेरणादायी ठरला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

रहिमतपुर पोलीसांची सुपर फास्ट कामगिरी २४ तासात सोने चोरीचा गुन्हा उघड, २ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

रहिमतपुर पोलीसांची सुपर फास्ट कामगिरी २४ तासात सोने चोरीचा गुन्हा उघड, २ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत रहिमतपुर पोलीस ठाणे

Live Cricket