Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » मॉरिशसमध्ये ‘ग्लोबल चेंज मेकर पुरस्काराने सक्सेस ॲबॅकस चे चेअरमन किरण पाटील यांचा सन्मान

मॉरिशसमध्ये ‘ग्लोबल चेंज मेकर पुरस्काराने सक्सेस ॲबॅकस चे चेअरमन किरण पाटील यांचा सन्मान

मॉरिशसमध्ये ‘ग्लोबल चेंज मेकर पुरस्काराने सक्सेस ॲबॅकस चे चेअरमन किरण पाटील यांचा सन्मान

सक्सेस ॲबॅकसच्या शैक्षणिक कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल

सातारा : विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड, आत्मविश्वास आणि बौद्धिक कौशल्ये विकसित करण्यासाठी गेल्या बारा वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या सक्सेस ॲबॅकस अँड एज्युकेशन इंडिया प्रा. लि.च्या शैक्षणिक कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. संस्थेचे चेअरमन किरण प्रकाश पाटील यांना मॉरिशस येथे आयोजित ‘लोकमत वन वर्ल्ड समिट अँड अवॉर्ड्स २०२६ या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय सोहळ्यात ‘ग्लोबल चेंज मेकर – इंटरनॅशनल अवॉर्ड’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या भव्य आंतरराष्ट्रीय सोहळ्यास मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष श्री. धरमबीर गोखूल, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते श्री. सुधीर मुनगंटीवार, लोकमत मीडिया समूहाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंग यांच्यासह भारत आणि मॉरिशसमधील विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती.

जगभरात प्रचलित असलेल्या ॲबॅकस अभ्यासक्रमाचा सखोल अभ्यास करून, साधारणतः ८ ते १२ स्तरांमध्ये शिकविला जाणारा हा अभ्यासक्रम किरण पाटील यांनी सखोल संशोधन व अभ्यासाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी केवळ ४ स्तरांमध्ये सुटसुटीत, शास्त्रशुद्ध आणि प्रभावी पद्धतीने पहिल्यांदा विकसित केला. विद्यार्थ्यांना कमी स्तरांमध्ये अधिक परिणामकारक ॲबॅकस शिक्षण मिळावे, या त्यांच्या अभिनव शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांना ‘ग्लोबल चेंज मेकर – इंटरनॅशनल अवॉर्ड’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सक्सेस ॲबॅकस ही विद्यार्थ्यांच्या गणितीय क्षमतेला चालना देण्याबरोबरच त्यांच्या एकाग्रता, स्मरणशक्ती, तर्कशक्ती, कल्पनाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या विकासासाठी ॲबॅकस शिक्षणाच्या माध्यमातून कार्य करणारी शैक्षणिक संस्था आहे. संस्थेच्या माध्यमातून ॲबॅकससोबतच वेदिक मॅथ्स आणि इतर कौशल्याधारित शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. गेल्या बारा वर्षांहून अधिक कालावधीत ५० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतले आहे.

विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच गणिताकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा, त्यांची गणितीय गणना अधिक वेगवान व अचूक व्हावी आणि त्यांच्यातील सुप्त क्षमता विकसित व्हावी, या उद्देशाने सक्सेस ॲबॅकसकडून सातत्याने विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत. या कार्यातून विद्यार्थ्यांसोबतच शिक्षण क्षेत्रात कार्य करू इच्छिणाऱ्या अनेकांना प्रशिक्षण व व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्याचे काम संस्थेने केले आहे.

‘ग्लोबल चेंज मेकर – इंटरनॅशनल अवॉर्ड’ हा सन्मान मिळाल्याबद्दल किरण पाटील यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे. हा पुरस्कार केवळ वैयक्तिक सन्मान नसून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या सक्सेस ॲबॅकसच्या संपूर्ण टीमचा, प्रशिक्षकांचा, फ्रँचायझी भागीदारांचा, पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा गौरव असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. “विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवून त्यांना योग्य दिशा आणि कौशल्याधारित शिक्षण देणे, हेच आमच्या कार्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. मॉरिशसमध्ये मिळालेला हा आंतरराष्ट्रीय सन्मान आमच्या संपूर्ण टीमसाठी प्रेरणादायी असून, भारतीय शिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी यापुढेही अधिक जोमाने कार्य करू,” अशी भावना किरण प्रकाश पाटील यांनी व्यक्त केली.

सक्सेस ॲबॅकसच्या शैक्षणिक कार्याला मिळालेल्या या आंतरराष्ट्रीय सन्मानामुळे सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

रहिमतपुर पोलीसांची सुपर फास्ट कामगिरी २४ तासात सोने चोरीचा गुन्हा उघड, २ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

रहिमतपुर पोलीसांची सुपर फास्ट कामगिरी २४ तासात सोने चोरीचा गुन्हा उघड, २ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत रहिमतपुर पोलीस ठाणे

Live Cricket