Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » श्रीपतराव पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

श्रीपतराव पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा 

श्रीपतराव पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा 

सातारा : करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन, (भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती) मोठ्या उत्साहात साजरी केली. संस्था सचिव तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक यशवंत गायकवाड यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या मा.डॉ.पल्लवी धात्रक,जिल्हा क्रीडा अधिकारी,सातारा.या उपस्थित होत्या तसेच शिक्षण प्रसारक संस्थेच्या अध्यक्षा वत्सला डुबल यांनी अध्यक्षस्थान भूषविले होते.

 मा.जिल्हा क्रीडाधिकारी यांनी आपल्या वक्तव्यातून मेजर ध्यानचंद यांचा जीवनपट मांडला व विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व ही पटवून दिले. विद्यालयाचे बँड पथक,प्रभात फेरी,वाद्यवृंदांनी सादर केलेली सुमधुर गीते तसेच विद्यार्थ्यांनी खेळलेले पारंपरिक खेळ यामुळे शालेय परिसर क्रीडामय झाला होता.

कार्यक्रमासाठी मा.डॉ.पल्लवी धात्रक जिल्हा क्रीडाधिकारी, सातारा,सुमित पाटील (राज्य क्रीडा मार्गदर्शक -फुटबॉल), सचिन मांडवकर (राज्य क्रीडा मार्गदर्शक- जिम्नॅस्टिक),कय्यूम शेख (राज्य क्रीडा मार्गदर्शक- मैदानी खेळ) व आर. वाय. जाधव सर (विभागीय अध्यक्ष शारीरिक शिक्षण महासंघ), शिक्षण प्रसारक संस्थेच्या अध्यक्षा वत्सला डुबल, पर्यवेक्षक रवींद्र निकम, सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जैवविविधतेने नटलेले कास पुष्पपठार

जैवविविधतेने नटलेले कास पुष्पपठार महाराष्ट्रातील उत्तर पश्चिम डोंगररांगा म्हणजे सह्याद्री. सहयाद्रीच्या या रांगात निसर्गाने भरभरुन दिलेला नैसर्गिक खजिनाच सातारा जिल्ह्याला

Live Cricket