नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » देश » धार्मिक » गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन

गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन

गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन

सातारा दि.27- मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम ४१ (क) नुसार धार्मिक व सार्वजनिक स्वरुपाच्या कार्यक्रमासाठी वर्गणी अथवा देणगी जमा करावयाची असल्यास सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. सातारा जिल्हयातील सर्व गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी व देणगीदारांनी विहीत मार्गाने परवानगीसाठी www.charity.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन सातारा विभागाचे सहायक धर्मादाय आयुक्त श्रीमती एस. एस. मांजरेकर यांनी केले आहे.  

परवानगीशिवाय सार्वजनिक उपक्रमास निधी जमा करणे हा फौजदारी स्वरुपाचा गुन्हा आहे. असे आढळल्यास कायद्याचे कलम ६६ व ६७ नुसार फौजदारी कारवाईची तरतूद आहे. संस्था नोंदणी अधिनियम, १८६० व मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० अन्वये नोंद असलेल्या व ज्यांच्या उद्देशामध्ये गणेश उत्सव साजरा करणे असा उल्लेख असणाऱ्या संस्थाना अशी परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. तसेच तात्पुरत्या स्वरुपातील परवानगीसाठी अर्ज ऑनलाईन पध्दतीने सादर करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे नवीन परवानगीसाठी अर्ज करतेवेळी त्या त्या क्षेत्रातील नगरसेवक, ग्रामपंचायतीकडील त्यांचे या ठिकाणी गणेश उत्सव साजरा करणेस अनुमती असलेचे संमती पत्रक सादर करणे आवश्यक आहे.   

गणेश उत्सव परवानगीचे आवश्यक अर्ज व आवश्यक माहिती पीडीएफ स्वरुपात या कार्यालयाचे वेबसाईटवर उपलब्ध आहे. सन २०२६ मधील तात्पुरत्या स्वरुपातील परवानगी देण्याचे काम दि. १ ते १४ सप्टेंबर कालावधीत कार्यालयात सुरु करणेत येणार आहे. अधिक माहितीसाठी तरी संबंधीत लोकांनी सहायक धर्मादाय आयुक्त, सातारा राजधानी टॉवर्स, तिसरा मजाला, यादोगोपाळ पेठ, सातारा येथील कार्यालयाशी संपर्क साधावा.

देणगीदारांनी देणगी देण्यापूर्वी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडील परवानगीची प्रत पाहुन खात्री करून देणगी अथवा वर्गणी बाबत निर्णय घ्यावा, असेही आवाहन सहायक धर्मादाय आयुक्त सातारा विभाग सातारा यांनी केले आहे.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket