नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » सातारा औद्योगिक क्षेत्रात कूपर उद्योगाचे विस्तारीकरण

सातारा औद्योगिक क्षेत्रात कूपर उद्योगाचे विस्तारीकरण

सातारा औद्योगिक क्षेत्रात कूपर उद्योगाचे विस्तारीकरण

सातारा प्रतिनिधी -सुमारे १०३ वर्षांची प्रदीर्घ आणि दैदिप्यमान ऐतिहासिक परंपरा असणा-या, तसेच साता-याच्या औद्योगिक नकाशावर महत्त्वपूर्ण योगदान देणा-या ‘कूपर कॉर्पोरेशन प्रा. लि. ने आपल्या नवीन विस्तार प्रकल्पाची (Expansion Project) घोषणा केली आहे. या भव्य प्रकल्पामुळे साता-यातील ३०० हून अधिक स्थानिक तरूणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

साता-याच्या औद्योगिक प्रगतीचा कणा मानल्या जाणा-या कूपर कॉर्पोरेशनने हाती घेतलेल्या या नवीन प्रकल्पाचा मुख्य उद्देश इंजिनसाठी लागणा-या विविध सुट्या भागांची (Engine Components) निर्मिती क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढवणे हा आहे.

तसेच कूपर कॉर्पोरेशनच्या एकूण उत्पादनापैकी ६० टक्क्यांहून अधिक भाग अमेरिका, युरोप आणि जगातील इतर प्रगत देशांमध्ये निर्यात केला जातो. कंपनीने गतवर्षी बाजारात दाखल केलेल्या ‘कूपर ट्रॅक्टर’ व्या चारही व्हेरिएंट्सना ग्राहकांचा आणि शेतक-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

साता-याच्या भूमीत १०३ वर्षापूर्वी रोवलेले हे औद्योगिक रोपटे आज आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तारले असून, नव्या विस्तार प्रकल्पामुळे साता-याच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला आणखी मोठी गती मिळेल, असा विश्वास व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.

नवीन एम. आय. डी. सी. मधील कूपर कॉर्पोरेशन प्रा. लि. च्या इंजिन विभागातील युनिट एम-६०/१ या जागेवर विस्तारीकरण निश्चित करण्यात आले आहे. मात्र, या प्लॉटच्या मध्यातून ३३ के. व्ही. (KV) आणि २२ के.व्ही. (KV) क्षमतेच्या हाय-टेन्शन वीजवाहिन्या गेल्या आहेत.

सुरक्षा नियमांनुसार या तारांखाली कोणतेही बांधकाम करता येत नाही. त्यामुळे बांधकामासाठी संपूर्ण जागा खुली व उपलब्ध व्हावी यासाठी या वीज वाहिन्या सदरील प्लॉटच्या सीमारेपेकडे (Borders) स्थलांतरित करणे अत्यावश्यक बनले आहे.

वीज वाहिन्या प्लॉटच्या सीमेकडे हलवण्यासाठी कूपर कॉर्पोरेशन प्रा. लि. ने ‘महावितरण’ (MSEDCL) आणि ‘महापारेपण’ (SETCL) कडे रीतसर प्रस्ताव पाठवले आहेत. मात्र, या प्रस्तावांवर वेळेत निर्णय न झाल्याने प्रत्यक्ष स्थलांतरास आणि पर्यायाने विस्तारीकरणाच्या कामास विलंब होत आहे. याशिवाय इतर संबंधित शासकीय परवानग्याही तातडीने मिळणे गरजेचे आहे.

स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळवून देणा-या या प्रकल्पासाठी वीज कंपन्यांनी तांत्रिक मंजुरी जलद गतीने देऊन वीज वाहिन्या प्लॉटच्या सीमारेषेवर स्थलांतरित करण्याचा मार्ग मोकळा करावा, जेणेकरून पुढील कामास अधिक विलंब होणार नाही.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket