अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » आई बापाच्या डोळ्यातील अश्रूंची किंमत ओळखा – वसंत हंकारे

आई बापाच्या डोळ्यातील अश्रूंची किंमत ओळखा – वसंत हंकारे

आई बापाच्या डोळ्यातील अश्रूंची किंमत ओळखा – वसंत हंकारे

खंडाळा :  किर्तन,प्रवचन,व्याख्यान अशा विविध मार्गाने आज सर्वत्र समाज प्रबोधन सुरु असुन प्रबोधनामुळे समाज परिवर्तन होणे गरजेचे आहे, प्रत्येकाला आपल्या आई बापाची किमंत त्यांच्या मृत्युनंतर कळते, मृत्युनंतर आई बापासाठी दिलेला नैवेद्य कधीच त्यांच्या पर्यत पोहचत नाही त्यामुळे जिवंत असताना आपले आई बाप जपा, त्यांना कमी पणा येईल असे वागु नका त्यांच्या मनाविरुद्ध कोणतीच गोष्ट करू नका असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याखाते वसंत हंकारे यांनी केले..

भादे ता खंडाळा येथे अखंड हरिनाम सप्ताह निमित्त वसंत हंकारे सर यांचे “आई बाप समजुन घेताना” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते,

यावेळी ज्येष्ठ नेते मिलिंद पाटील, बाजार समितीचे सभापती सुनील शेळके, संभाजीराव साळुंखे, शंकरराव क्षीरसागर, यशवंत चव्हाण, संभाजी घाडगे, सागर शेळके, शरद देशपांडे, तानाजी साळुंखे,मुगुटराव साळुंखे, अँड पंकज साळुंखे, उमेश पवार आदी मान्यवर व भादे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना वसंत हंकारे म्हणाले माणसातील माणुस जागा करण्याचे काम आज प्रत्येकाला करावे लागणार आहे, प्रत्येक मुलाला आपल्या आई बापाची स्वप्ने पुर्ण करणे शक्य नाही मात्र प्रत्येकाला आई बापाच्या डोळ्यातील आश्रुची किमंत ओळखता आली पाहिजे, आपल्या मुळे आई बापाला खाली बघायला लागले तर आपले जगणे व्यर्थ आहे.भिमराव चव्हाण यांनी मान्यवराचे स्वागत केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket