अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » मुंबईतील मोकळी मैदाने वाचविण्यासाठी रविवारी तिरंगा मोर्चा; मनसेही सहभागी होणार- आदित्य ठाकरे!

मुंबईतील मोकळी मैदाने वाचविण्यासाठी रविवारी तिरंगा मोर्चा; मनसेही सहभागी होणार- आदित्य ठाकरे!

मुंबईतील मोकळी मैदाने वाचविण्यासाठी रविवारी तिरंगा मोर्चा; मनसेही सहभागी होणार- आदित्य ठाकरे!

मुंबई :मुंबईतील मोकळ्या मैदानांच्या जागा खासगी संस्था भाजप नेत्यांना देण्याचा घाट घालण्यात आला आहे. यामध्ये अंधेरील मैदानासह मुंबईतील आणखी दोन भूखंडांचा समावेश असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ दिवसांत हे भूखंड देण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले असल्याचा दावा शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी केला. मुंबईतील मोकळी मैदाने वाचविण्यासाठी वांद्रे येथील नेव्हील डिसुजा टर्फसमोर रविवारी तिरंगा मोर्चा काढण्यात येणार आहे, या मोर्चात शिवसेनेसोबत मनसेही सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मोकळी मैदाने हडपण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला. मुंबईतील एक मैदान आणि आणखी दोन भूखंड हे मुख्यमंत्री फडणवीस एका भाजपच्या आमदाराला भेट देणार आहेत. या भूखंडाची किंमत १० वर्षांपूर्वी साडेपाचशे कोटी होती, तर आज याची किंमत किती असेल, असा सवाल करताना मुख्यमंत्र्यांकडून हा भूखंड एका भाजपच्या आमदाराला २१ लाख रुपये प्रतिवर्ष इतक्या किमतीवर देत असून असे एकूण तीन भूखंड हे मुख्यमंत्र्यांच्या एका मित्राला म्हणजे एका खासगी संस्थेला देत आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. मुंबईतील २२ बस डेपो असतील किंवा भूखंड हे मुख्यमंत्री फडणवीस स्वत:च्या मित्रांना देत असतील तर हा घोटाळा उघड दिसत आहे. पंतप्रधान मोदींचे या भ्रष्टाचाराकडे लक्ष आहे का, आम्ही याबाबत न्यायालयात गेलो आहोत, आता न्यायालयाचा निर्णय अपेक्षित आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

मोकळ्या मैदानांच्या खासगीकरणाचा भाजपचा डाव असून याविरोधात रविवारी संध्याकाळी ५ वाजता तिरंगा हाती घेऊन आंदोलन करण्यात येणार आहे. मोकळ्या जागा वाचवण्यासाठी नागरिकांनी आंदोलनात सहभागी व्हावे, हा भूखंडचा घोटाळा थांबला पाहिजे. मुंबईसाठी सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. या आंदोलनात मनसे नेते अमित ठाकरे हेही सहभागी होणार आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे यासाठी त्यांच्याशी चर्चा सुरू असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket