अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » CKYC २.० ची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी कराड अर्बन बँकेचा महत्त्वपूर्ण उपक्रम

CKYC २.० ची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी कराड अर्बन बँकेचा महत्त्वपूर्ण उपक्रम

CKYC २.० ची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी कराड अर्बन बँकेचा महत्त्वपूर्ण उपक्रम

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवार दि. १४/०८/२०२६ रोजी दि कराड अर्बन को-ऑप बँक लि., कराड आणि ट्रॅकव्हीझ (टी.एस.एस. कन्सल्टन्सी प्रा. लि., मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने बँकिंग प्रणालीमध्ये लवकरच येणाऱ्या महत्वपूर्ण बदल CKYC २.० साठी “ऑपरेशन भरोसा” मास्टरक्लासचे आयोजन करण्यात आलेले होते. 

या प्रशिक्षण मेळाव्यासाठी खास मुंबईहून आलेल्या ट्रॅकव्हीझचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सागर तन्ना यांचे कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष श्री. समीर जोशी आणि उपाध्यक्ष श्री. शशांक पालकर यांच्याकडून मराठमोळ्या पद्धतीने स्वागत आणि सत्कार घेण्यात आला. कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. धनंजय शिंगटे यांनी प्रास्ताविक मांडले आणि KYC-AML बद्दल वारंवार असे प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जातील असे नमूद केले. 

CKYC २.० मधील नेमके बदल कसे असतील, यासाठी बँकांनी कोणती पूर्वतयारी करावी आणि अंमलबजावणी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याचे श्री.सागर तन्ना यांनी प्रभावशाली प्रात्यक्षिक दाखवून समजावून सांगितले. कराड अर्बन बँकेचे उपमहाव्यवस्थापक सीएस. अमित रेठरेकर यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थी यांचे याबद्दल शंकानिरसन केले. 

सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील सुमारे ५० हून अधिक नागरी सहकारी बँकांमधून १०० हून अधिक प्रतिनिधींनी या मास्टरक्लास मध्ये सहभाग नोंदविला. लवकरच येणाऱ्या CKYC २.० च्या बदलास सामोरे जाताना या प्रशिक्षणामुळे सर्वांना योग्य पद्धतीने नियोजन करण्यास मदत मिळाली. 

या प्रशिक्षण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहा. महाव्यवस्थापक श्री. विकास खबाले आणि आभार प्रदर्शन व्यवस्थापक श्री. अभिजित माने यांनी केले. 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket