साताऱ्याला रेल्वे कनेक्टिव्हिटीचा ‘डबल डोस’;खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांची रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मोठी मागणी

सातारा : सातारा जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांची रेल भवन येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांवर विविध महत्त्वाच्या गाड्यांना थांबे देण्यासह बंद करण्यात आलेल्या रेल्वे सेवा पूर्ववत करण्याच्या मागण्या करण्यात आल्या.
जरंडेश्वर रेल्वे स्टेशन हे सातारा आणि कोरेगाव तालुक्यातील सीमेवर असून कोविड पूर्व कालपासून इथे थांबणार्या मुंबई कडे जाणार्या गाड्या बंद झाल्या असून, ११०३९/११०४० व ११४२५/११४२६ या गाड्यांना इथे थांबा मंजूर केल्यास ह्या रेल्वे स्टेशन वरुण प्रवासी वाहतुक सुरू होईल व त्याचा प्रवाशांना फायदा होईल.
१६५३३/१६५३४ ही गाडी राजस्थान आणि कर्नाटक राज्यांना जोडणारी गाडी असून, दोन्ही राज्यात जाणार्या या भागातील प्रवाशांना अत्यंत उपयुक्त गाडी आहे. या गाडी कराड रेल्वे स्टेशन येथे थांबा पूर्ववत केल्यास ह्या गाडी चा वापरकर्त्यांना त्याचा निश्चित फायदा होईल.
१९६६८/१९६६७ म्हैसूर उदयपूर हमसफर एक्सप्रेस. ही गाडी राजस्थान राज्यातील व कर्नाटक राज्यातील प्रवाशांना फायद्याची असून या गाडीला सातारा येथे थांबा मिळावा.
२२६८५/२२६८६ यशवंत पूर चंदीगड. संपर्क क्रांती एक्सप्रेस ही गाडी सैन्य दलातील व पूर्वेकडील राज्यातील व कर्नाटक राज्यातील प्रवाशांना फायद्याची असून या गाडीला सातारा येथे थांबा मिळावा. १७३१७/१७३१८ दादर हुबळी एक्सप्रेस या गाडीचा सातारा येथील थांबा पूर्ववत करण्यात यावा.
१२६२९/१२६३० म्हैसूर निझामुददीन संपर्क क्रांती एक्सप्रेस ही गाडी सैन्य दलातील व पूर्वेकडील राज्यातील व कर्नाटक राज्यातील प्रवाशांना फायद्याची असून या गाडीला सातारा येथे थांबा मिळावा.
११०४९/११०५० कोल्हापूर अहमदाबाद या गाडी कराड येथे थांबा दिल्यास गुजरात राज्यातील प्रवाशांना याचा फायदा होईल.
२०६६९/२०६७० पुणे हुबळी वंदे भारत एक्सप्रेस या गाडीस कराड येथे थांबा देण्यात यावा.
१६५३३/१६५३४ जोधपूर एक्सप्रेस या गाडीस कराड येथे थांबा देण्यात यावा.
११०२३/११०२४ सह्याद्री एक्सप्रेस ह्या गाडी पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद असून ही गाडी मुंबई पर्यंत पूर्ववत करण्यासाठी सर्व जिल्ह्यातून मागणी असून ही गाडी तात्काळ पूर्ववत करून मुंबई पर्यंत चालवण्यात यावी.
११०२७ दादर सातारा एक्सप्रेस ही गाडी पंढरपुर मार्गे जात असल्याने सातारा जिल्ह्यातील पंढरपुर मोहोळ या भागात जाणार्या प्रवाशांना फायद्याची आहे, त्यामुळे ही गाडी दररोज करण्यात यावी.
१६५८९/१६५९० राणी चेनम्मा एक्सप्रेस ही गाडी सातारा पर्यंत वाढविण्यात यावी.
सातारा जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या सर्व मागण्यांबाबत रेल्वेमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून, या मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सातारा, कराड, कोरेगाव आणि परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.




