अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » महाराष्ट्राच्या मनातील सुपरस्टार महाराष्ट्र भूषण व पद्मश्री अशोक सराफ यांचा गौरव!

महाराष्ट्राच्या मनातील सुपरस्टार महाराष्ट्र भूषण व पद्मश्री अशोक सराफ यांचा गौरव!

महाराष्ट्राच्या मनातील सुपरस्टार महाराष्ट्र भूषण व पद्मश्री अशोक सराफ यांचा गौरव!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर येथे महाराष्ट्र भूषण व पद्मश्री अशोक सराफ यांच्या 80 व्या वर्षात पदार्पण निमित्ताने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयातून सर्वांना मराठी सिनेमाची गोडी लावली आणि मराठी सिनेमाला एक उंची व लोकाभिमुखता दिली. अशोक सराफ यांचा अभिनय अत्यंत सहज आहे त्यात कुठलीही कृत्रिमता जाणवत नाही, सहजतेने त्यांनी प्रत्येक भूमिका साकारली.

मराठी माणूस हा वास्तवात जगणारा आहे, त्यामुळे अशोक सराफ यांनी साकारलेल्या नायकामध्ये मराठी माणसाला स्वतःचे अस्तित्व दिसले आणि म्हणूनच अशोक सराफ हे खऱ्या अर्थाने सर्वांच्या मनातील सुपरस्टार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

हास्यरस आणि त्याची पद्धत बदलत गेली, या सर्व गोष्टींना एक वेगळे वळण देण्याचे काम अशोक सराफ यांनी केले. टीव्हीवरील ‘हम पाँच’सारख्या मालिकांमध्ये सहजतेने हास्यरस निर्माण होणे हे पाहायला मिळायचे. त्यांनी मराठीसोबतच हिंदी सिनेमांमध्येही भरपूर काम केले. हिंदी सिनेमांमध्येही त्यांनी आपले वेगळेपण दाखवून दिले, तसेच नाटकांच्या माध्यमातून त्यांनी रंगभूमीची सेवा केली. उत्तम कलावंतच नव्हे, तर उत्तम माणूस म्हणूनही आपण त्यांच्याकडे पाहू शकतो, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

यावेळी नागपूरच्या महापौर निता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वाखरे, गटनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, माजी आमदार संदीप जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket