अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » क्षयरोगमुक्त भारत अभियान : साधना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जनजागृतीपर व्याख्यान व रॅलीचे आयोजन.

क्षयरोगमुक्त भारत अभियान : साधना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जनजागृतीपर व्याख्यान व रॅलीचे आयोजन.

क्षयरोगमुक्त भारत अभियान : साधना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जनजागृतीपर व्याख्यान व रॅलीचे आयोजन.

१० कोटी प्रतिज्ञा महाअभियानाच्या तयारीच्या अनुषंगाने स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सातारा : क्षयरोगमुक्त भारत अभियानाच्या (TB-Mukt Abhiyan) अंतर्गत आज साधना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता ६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच NCC कॅडेट्ससाठी माहितीपूर्ण व प्रभावी जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या सत्रामध्ये क्षयरोग (TB), त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय तसेच विविध प्रकारच्या व्यसनांचे दुष्परिणाम याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी सेवाकेंद्र, कल्याणीनगर, सातारा येथील ब्रह्माकुमारी रुक्मिणी बहन, ब्रह्माकुमारी रत्नप्रभा बहन, ब्रह्माकुमार वामन भाई, ब्रह्माकुमार राजेश भाई आणि ब्रह्माकुमार विजय भाई यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना निरोगी जीवनशैलीचे महत्त्व, व्यसनांपासून दूर राहण्याची गरज तसेच क्षयरोगाबाबत समाजामध्ये जनजागृती करण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

हा कार्यक्रम यशोदा शिक्षण संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. दशरथ सागरे सर तसेच साधना इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सौ. वैशाली धुमाळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.

व्याख्यानानंतर NCC Officer सौ. निलिका पाटील तसेच दोन शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली शाळेपासून अजंठा चौकापर्यंत जाऊन पुन्हा शाळेत परतली. NCC कॅडेट्सनी उत्स्फूर्त सहभाग घेत नागरिकांशी संवाद साधत क्षयरोग प्रतिबंध, निरोगी जीवनशैली आणि व्यसनांचे दुष्परिणाम याबाबत जनजागृती केली.

व्याख्यानातून मिळालेली माहिती कॅडेट्सनी नागरिकांपर्यंत पोहोचवत आरोग्य जनजागृती आणि सामाजिक जबाबदारीचे युवा दूत म्हणून आपली भूमिका प्रभावीपणे पार पाडली.या उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ महत्त्वपूर्ण माहिती मिळाली नाही, तर निरोगी, व्यसनमुक्त आणि क्षयरोगमुक्त समाज निर्माण करण्यासाठी सक्रिय सहभाग घेण्याची प्रेरणाही मिळाली. विद्यार्थ्यांचा व NCC कॅडेट्सचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा उपक्रम अत्यंत अर्थपूर्ण आणि प्रभावी ठरला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket