अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सातारा :- इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडुन राज्यातील महानगर पालिका, विभागीय शहरे जिल्हास्तरावरील सर्व शैक्षणीक संस्थामध्ये प्रवेश घेतलेल्या मान्यताप्राप्त शासकीय, अनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतन मध्ये प्रवेश घेणाऱ्या व वसतिगृह योजनेपासून वंचित असणाऱ्या धनगर समाजातील विद्यार्थी निवासी व शैक्षणिक सुविधांपासुन वंचित राहू नये यासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेणारे व ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये 2.50 लाख पेक्षा कमी आहे असे विद्यार्थी पात्र असून जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्रतिवर्ष 43 हजार व तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रुपये 38 हजार प्रमाणे लाभाचे वितरण केले जाणार आहे.

या योजनेंतर्गत १२ वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी आणि एम.ए, एम.एससी असे पदवीनंतरचे पदव्युत्तर अभ्यासक्रम व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या प्रथम, व्दितीय, तृतीय वर्षाकरिता ऑनलाईन अर्ज 18 सप्टेंबर पर्यत https://hmasnew.mahait.org वर प्रवेश अर्ज भरता येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट कार्यालयात जमा करणे बंधनकारक आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्यान विभागाच्या सहायक संचालक सुजित बर्गे यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket