जनतेच्या विश्वासाचा मानबिंदू… वाई पश्चिमचे लोकप्रिय नेतृत्व दिनकर (बापूसो) शिंदे वाढदिवस विशेष
वाई(अली मुजावर )-वाई तालुक्याच्या पश्चिम विभागातील जनतेच्या मनात विश्वासार्ह नेतृत्व म्हणून आपली ओळख निर्माण करणारे सातारा जिल्हा परिषद सदस्य दिनकर बापूसो शिंदे हे विकासाभिमुख, संयमी आणि लोकाभिमुख नेतृत्वाचे उत्तम उदाहरण आहेत. समाजकारणाची बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे हे नेतृत्व आज वाई तालुक्याच्या पश्चिम भागाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक विजय संपादन करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) अधिक बळकट करण्यामध्ये मोलाचे योगदान दिले. हा विजय केवळ राजकीय नव्हता, तर जनतेने त्यांच्या कार्यावर दाखवलेल्या विश्वासाचा ठसा होता.
सातारा जिल्हा परिषद कृषी समिती सदस्य म्हणून त्यांनी शेतकरी हिताच्या अनेक विषयांवर प्रभावीपणे काम केले आहे. तसेच शिक्षण, सामाजिक विकास, मूलभूत सुविधा आणि ग्रामीण भागातील विकासकामांना त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. यशवंतनगर जिल्हा परिषद गटासह संपूर्ण पश्चिम विभागात विविध विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.
राजकारण हे केवळ सत्तेसाठी नव्हे, तर समाजसेवेसाठी असते, या विचारावर विश्वास ठेवून दिनकर( बापूसो )शिंदे यांनी सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, युवक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी अहोरात्र काम केले आहे. त्यांच्या साधेपणामुळे, कार्यतत्परतेमुळे आणि लोकांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्यामुळे त्यांना समाजात विशेष मानाचे स्थान लाभले आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि भविष्यातही अशीच जनसेवा करण्यासाठी भरभरून ऊर्जा लाभो, तसेच वाई तालुक्याच्या पश्चिम भागात आणि यशवंतनगर जिल्हा परिषद गटात विकासाची गंगा अखंड वाहत राहो, हीच मनःपूर्वक सदिच्छा.




