ग्राहक हक्कांच्या जनजागृतीचा आठ वर्षांचा यशस्वी प्रवास; ग्राहक कल्याण फाउंडेशनचा वर्धापन दिन उत्साहात
पुणे -ग्राहक चळवळीत अग्रगण्य असणाऱ्या ग्राहक कल्याण फाउंडेशनची ९ ऑगष्ट २०१८ रोजी स्थापना झाली असुन रविवार दि. ०९.०८.२०२६ रोजी आठवा वर्धापन दिन सासवड येथे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. तुकाराम महाराज निंबाळकर यांचे अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी बोलताना तुकाराम महाराज निंबाळकर यांनी संघटनेची बांधणी गावागावातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून त्यांच्या व्यथांना योग्य न्याय मिळवून द्यावा आणि कार्यकर्त्यांनी अभ्यासोनी प्रकटावे या उक्तीप्रमाणे आपला अभ्यास वाढवावा असे आवाहन केले.
राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य व संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. विकास महाजन साहेब यांनी संस्थेच्या विस्ताराची माहिती दिली. पुरंदर तालुका कार्यकारिणीच्या वतीने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. याप्रसंगी तालुका कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी व सदस्य जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी व राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी हजर होते. ग्राहक कल्याण फाउंडेशन सातारा जिल्हा अध्यक्ष प्रमोद माने, अजय कांबळे, महादेव भिलारे, जी. के. अमराळे व त्यांचे सहकारी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष काळे यांनी केले. संतोष काकडे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. राजेश दळवी व सुनील लोणकर यांनी संघटनेस शुभेच्छा दिल्या. उत्तमराव झेंडे यांनी संस्थेस येणाऱ्या अडचणी विषद केल्या. सूत्रसंचालन व आभार संतोष मगर यांनी मानले. जिल्हा कार्यकारणीचे उपाध्यक्ष शिवाजी सुळके, तालुका कार्यकारिणीचे उपाध्यक्ष बबनराव काळे, सचिव दिलीप काळे, रामदास रांजणे, तुळशीराम काळे, नथू मिसाळ, बळीराम सोनवणे, संतोष भांडवलकर व इतर सदस्य उपस्थित होते.





