गौरीशंकर मध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन उत्साहात साजरा.ग्रंथ प्रदर्शन व विविध स्पर्धांचे आयोजन. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. स्पर्धेतील विद्यार्थ्यांना पुस्तके देऊन गौरविले.
लिंब- पद्मश्री डॉ एस.आर. रंगनाथन यांचा जन्मदिन संपूर्ण देशभर राष्ट्रीय ग्रंथालय दिन म्हणून साजरा केला जातो. ग्रंथालय चळवळ व्यापक व्हावी व विद्यार्थी व समाज घटकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या दृष्टीने या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन सर्वत्र केले जाते. गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालयात पद्मश्री डॉ एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ संतोष बेल्हेकर. संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ भूषण पवार. डॉ धैर्यशील घाडगे. डॉ माधुरी मोहिते. डॉ लीना पाठक. रजिस्ट्रार निलेश पाटील. ग्रंथपाल विजय निकम. आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी ग्रंथालय चळवळीचे महत्त्व व त्याची उपयुक्तता याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. या निमित्ताने उत्कृष्ट वाचक पुरस्कार आकांक्षा प्रमोद जठार. अंजली माणिक शिंदे. या विद्यार्थिनींना देण्यात आला. तर प्रा सायली दळवी. गौरी इथापे. ओंकार काळे यांना देण्यात आला. तसेच उत्कृष्ट अभ्यागत यामध्ये कु.दिव्या तावरे. अजिंक्य अटोले. तसेच प्रा नूतन गवांदे. लॅब टेक्निशियन प्रशांत शेडगे यांना पुस्तके देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रियंका चव्हाण यांनी केले. आभार कु वैष्णवी घनवट हिने केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा. मृणाल ठाकरे. प्रा. प्रियंका शिंदे. व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी परिश्रम घेतले.




