साताऱ्यात १३ ऑगस्टला भाजपाचे सेवा अभियान नागरिकांचे प्रलंबित/नवीन शासकीय कामाची निवेदनं स्विकारली जाणार रखडलेली व नव्याने दाखल कामे मार्गी लागणार.
सातारा दि १० : विविध कारणांमुळे नागरिकांची शासकीय कार्यालयाकडील अडकलेली व नवीन कामे मार्गी लावण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यात भाजपा सेवा अभियानांतर्गत गुरुवार दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी स. १० ते दु. २ या वेळेत शासकीय विश्रामगृह (सर्किट हाऊस) सातारा येथे मा. संतोषजी साखरे हे भाजपा प्रदेशाध्यक्ष आर. रविंदजी चव्हाण यांना अग्रेषित केलेली नागरिकांची प्रलंबित/नवीन शासकीय कामाची निवेदने समक्ष स्वीकारणार आहेत.
तरी संबंधित नागरिकांनी आपली निवेदनं देऊन सेवा अभियानाचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा नेते व या उपक्रमांतर्गत सातारा जिल्हा दौरा समन्वयक, जिल्हाध्यक्ष , आ.अतुलबाबा भोसले यांनी केले आहे.
निवेदनं प्राप्त होताच दुसऱ्या दिवशी संबंधित शासकीय कार्यालयाकडे प्रलंबित/नवीन कामाचा पाठपुरावा करुन कामे मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याने कामे वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल व नागरिकांची कामे मार्गी लावण्यासाठी हे भाजपाचे अभियान सुरु आहे अशी माहिती त्यांनी दिली.





