अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » भैरवगड ग्रामस्थांचे उपोषण अखेर संपले भुस्खलन ग्रस्तांच्या मागण्यांचा होणार फेरविचार बुधवारी मंत्रालयात पुनर्वसन मंत्र्यांसोबत बैठक निश्चित

भैरवगड ग्रामस्थांचे उपोषण अखेर संपले भुस्खलन ग्रस्तांच्या मागण्यांचा होणार फेरविचार बुधवारी मंत्रालयात पुनर्वसन मंत्र्यांसोबत बैठक निश्चित 

भैरवगड ग्रामस्थांचे उपोषण अखेर संपले भुस्खलन ग्रस्तांच्या मागण्यांचा होणार फेरविचार बुधवारी मंत्रालयात पुनर्वसन मंत्र्यांसोबत बैठक निश्चित 

नागठाणे दि.१०(प्रतिनिधी ) गेल्या सात वर्षापुर्वी अतिवृष्टी मुळे झालेल्या भूस्खलनात बाधित झालेल्या भैरवगड (ता . सातारा )येथील ग्रामस्थांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेले उपोषण अखेर प्रशासनाच्या सकारात्मक आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. ग्रामस्थांच्या मागण्यांचा फेरविचार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या प्रश्नावर येत्या बुधवारी मंत्रालयात पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.

भैरवगड येथील भूस्खलनग्रस्त ग्रामस्थांच्या पुनर्वसनासह विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी गावातच उपोषणाचे हत्यार उपसले होते. या आंदोलनाची दखल घेत आमदार मनोज घोरपडे यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधितांची बैठक घेण्यात आली.

या बैठकीस आमदार मनोज घोरपडे, जिल्हा परिषद सदस्य अजित साळुंखे, जिल्हाधिकारी संतोष पाटील तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी पुनर्वसन करताना शासनाने ठरवलेली पाचशे स्क्वेअर फुट जागा व बांधकामासाठी देण्यात येणारी .दीड लाख रूपये रक्कम भूस्खलनग्रस्त ग्रामस्थांना अमान्य होती . त्या ऐवजी सातशे स्क्वे. फुट जागा व बांधकामासाठी जास्तीत जास्त रक्कम मिळवुन देण्याच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यापूर्वीच्या निर्णयांचा तसेच प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन मागण्यांचा फेरविचार व रेखांकन करण्याबाबत सकारात्मक भूमिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, या प्रश्नावर आता थेट मंत्रालयात चर्चा होणार असल्याने ग्रामस्थांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. येत्या बुधवारी पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांच्या सोबत होणाऱ्या बैठकीत भैरवगडच्या पुनर्वसनाचा प्रश्न, भूस्खलनग्रस्तांच्या मागण्या आणि त्यावरील शासनाची पुढील कार्यवाही याबाबत ठोस निर्णय होण्याची अपेक्षा आहे.प्रशासनाच्या आश्वासनानंतर उपोषण थांबवुन आमदार, जि .प सदस्य व प्रशासनास सहकार्य करत पाठपुरावा चालुच ठेवण्याचा निर्णय उपोषण कर्त्यानी घेतला आहे .

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket