उंब्रज पोलीसांची मोठी कामगिरी:- सायबर फसवणुकीतील 82,500/- रुपये अवघ्या काही तासांत केले फिर्यादी यांच्या ताब्यात देण्यात आली.

दिनांक 02/08/2026 रोजी उंब्रज पोलीस ठाणे येथे फिर्यादी नामे अनुज संजय नगाने रा उंब्रज ता कराड जि सातारा यांनी त्यांच्या सोबत ऑनलाईन झालेल्या फ्रॉड बाबत तक्रार दिली होती. फिर्यादी यांचा ट्रान्सफोर्टचा व्यवसाय आहे. फ्रॉड कॉलर यांने फिर्यादीस तुला पाच ते दहा रुपयांनी पेट्रोल पेरले फाटा ता कराड येथे स्वस्त दराने देतो असे आमीष दाखवुन फ्रॉड कॉलरने फिर्यादीच्या व्हाटसअॅप वर स्कॅनर पाठवला व त्यावर पैसे पाठवणेस सांगितले. फिर्यादी यांनी फ्रॉड कॉलच्या आमीषास बळी पडुन एकुण 82,500/- रुपये पाठवले. फिर्यादीस फ्रॉड कॉलर याने पैसे मिळाल्यानंतर पेट्रोल दिले नाही तसेच रक्कम देखील परत केली नाही. फिर्यादीस आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी उंब्रज पोलीस ठाणेत येथे तक्रार दिली. त्याप्रमाणे तात्काळ तांत्रिक तपास सुरु करुन, मा. पोलीस अधीक्षक साो, सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलच्या मदतीने संबंधीत बँक खात्यांशी संपर्क साधुन लवकरात लवकर ट्रान्झेंक्शन फ्रीज करण्याची कारवाई करण्यात आली. फिर्यादी यांची रक्कम रुपये 82,500/- रुपये (100%) त्यांना फिर्यादी यांच्या बँकेस मेल करुन त्यांना यशस्वीरीत्या त्यांची रक्कम परत मिळवुन दिली.
पोलीस प्रशासन नागरिकांना आवाहन करीत आहे की, सध्याच्या डिजिटल युगात सायबर गुन्हांचे प्रमाण वाढत आहे. त्याकरीता नागरिकांनी कोणत्याही अनधिकृत लिंकवर क्लिक करुन नका. बँक तपशील ओटीपी (OTP) किंवा पिन कोणाशी शेअर करु नये. सायबर फसवणुक झाल्यास तातडीने 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांकावर किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा. उंब्रज पोलीसांनी सतर्कता आणी तांत्रिक कौशल्याचे उत्तम उदाहरण देत एका फसवणुक झालेल्या नागरिकाचे पैसे सुरक्षीतपणे परत मिळवुन दिले आहेत.
सदरची कारवाई मा. श्री. निखील पिंगळे पोलीस अधीक्षक साो सातारा, मा. डॉ. वैशाली कडुकर मॅडम अपर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनात व मा. राजश्री पाटील उप विभागीय पोलीस अधिकारी कराड यांचे आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, महीला पोलीस कॉन्स्टेबल निलम वैराट, यांनी सातारा सायबर पोलीस ठाणे येथील अधिकारी व अमंदार यांचे मदतीने करण्यात आली.




