अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » मुंबई वेधशाळेचा पाच दिवसांचा हवामान अंदाज; राज्यातील विविध जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई वेधशाळेचा पाच दिवसांचा हवामान अंदाज; राज्यातील विविध जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई वेधशाळेचा पाच दिवसांचा हवामान अंदाज; राज्यातील विविध जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई : मुंबई वेधशाळेने पुढील पाच दिवसांसाठी राज्यातील हवामानाचा अंदाज जाहीर केला असून, काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता लक्षात घेऊन ऑरेंज व यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी हवामानाच्या स्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.

 ५ ऑगस्ट रोजी रायगड जिल्हा व पुणे जिल्ह्यातील घाट परिसरास ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच नाशिक घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दि. ६ ऑगस्ट रोजी नाशिक घाट, सातारा घाट, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून यलो अलर्ट देण्यात आला आहे.

७ ऑगस्ट रोजी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

८ ऑगस्ट रोजी सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना व विजांच्या कडकडाटाची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे.

नागरिकांनी स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाने वेळोवेळी जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाच्या शक्यतेमुळे आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket