वाई गुन्हे प्रकटीकरण विभागांकडुन२४ तासाच्या आत अल्पवयीन ३मुलांचा शोध घेवून त्यांना सुखरुप दिले पालकांच्या ताब्यात
दि.०१/०८/२०२६ रोजी वाई पोलीस ठाणे येथे ०३ अल्पवयीन मुले पळवून नेलेबाबत वाई पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि.नं. २१४/२०२६ बी.एन.एस.एस १३७ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल होताच गुन्हयाचे गांभीर्य ओळखून ताडतीने पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांनी सदरबाबत मा पोलीस अधिक्षक सोो सातारा व उपविभागीय पोलीस अधिकारी वाई यांची परवानगी घेऊन सदर गुन्हयाच्या अनुषंगाने गुन्हेप्रकटीकरण पथकासोबत चर्चा व मार्गदर्शन करुन ०३ टिम तयार केल्या त्यानुसार सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे व इतर पोलीस स्टाफ यांनी सदर गुन्हयाच्या तपासकामी टिम बनवल्या, त्यातील एक टिम वाई परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहणी करता रवाना झाली, दुसरी टिम मांढरदेवी बाजुकडे रवाना झाली व तिसरी टिम पाचगणी बाजुकडे रवाना झाली, सर्व टिमनी सदर मुलांचा शोध घेणे सुरु केले असताना, पहिल्या टिममधील पोकॉ १२३८ धोत्रे यांना वाई एमआयडीसी चांदणी चौक येथील एका सीसीटीव्ही फुटेज मध्ये सदर अपहरीत तीन मुले रस्त्याने फिरत असताना दिसून आली, त्यानंतर पोकॉ १२३८ धोत्रे यांनी पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे यांना सीसीटीव्ही बाबत माहिती सांगितलेनंतर त्यांनी सर्व टिम एकत्रित करुन सर्वाना बोपर्डी येथे मुलांचा शोध घेण्यास सुचना दिल्या, त्यानुसार सर्वांनी बोपर्डी गावात त्यानंतर धावडी, बोपर्डी, लोहारे, सुलतानपूर, शेलारवाडी येथे जावुन सर्वांना मुलांचे फोटो दाखवुन सदर मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोध घेत असताना सदर तीन मुले हि आयटीआय कॉलेज परिसरात डोंगराच्या बाजुला पळत असताना दिसली त्यानुसार सर्व पोलीस स्टाफ यांनी डोंगर परीसरात सापळा रचून त्या मुलांचा पाठलाग करुन शोध घेण्यास सुरुवात केल्यानंतर डोंगराच्या पलीकडील बाजुस रेणुसे वस्ती येथे ३ मुले सुखरुप मिळून आली. सदर ३ मुले मित्र असून सायकल चालवत फिरत फिरत निघून गेली होती तरी मुलांचे समुपदेशन करुन त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासाच्या आत ३ मुलांचा शोध घेवून वाई पोलीसांनी चांगली कामगिरी केली आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक साो श्री. निखिल पिंगळे, मा. अपर पोलीस अधीक्षक साो डॉ. वैशाली कडुकर मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो वाई विभाग श्री. सुनील साळुंखे, यांचे मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री. प्रदीप सुर्यवंशी, तपासपथकाचे पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे, पो.कॉ नितीन कदम, पो. कॉ विक्रम धोत्रे, पो.कॉ हेमंत शिंदे, पो. कॉ विशाल शिंदे, पो.कॉ पो.कॉ. विशाल येवले, होमगार्ड इंद्रजित लाखे यांच्या पथकाने केली आहे.





