वन विभागाच्या रात्रगस्तीमुळे शिकारींना आळा; पुसेगाव खोऱ्यात जनजागृतीलाही वेग
पुसेगाव (प्रतिनिधी) : खटाव तालुक्यातील पश्चिम भागातील पुसेगाव खोरे हे घनदाट जंगल आणि समृद्ध वन्यजीव संपदेसाठी ओळखले जाते. या परिसरात सायाळ, लांडगा, कोल्हा, रानडुक्कर आदी वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आढळतात. ऑक्सिजन पार्क म्हणून ओळख असलेल्या या भागातील वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी वन विभागाने नियमित रात्रगस्त सुरू केली असून, त्यामुळे शिकारींवर प्रभावी आळा बसल्याचे चित्र आहे.

वनपरीक्षेत्र अधिकारी नितीन आटपाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल राजाराम काशीद, वनरक्षक गौतम सोनकांबळे, संतोष काळे, रूपाली माने तसेच वनसेवक प्रशांत मदने, युवराज मदने, संतोष जाधव, तुषार जगताप आणि आप्पा मोहिते हे नियमितपणे रात्रगस्त करत आहेत. या पथकाकडून जंगल परिसरात सातत्याने गस्त घालून वन्यजीव संरक्षणावर विशेष भर दिला जात आहे.
यासोबतच गावागावांत बैठका घेऊन बिबट्यासंदर्भात जनजागृती केली जात आहे. मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी नागरिकांना योग्य मार्गदर्शन केले जात असून, वन्यजीवांबाबत जागरूकता निर्माण करण्याचे कामही प्रभावीपणे सुरू आहे.
सागर मदने यांनी सांगितले की, “वन विभागाकडून आमच्या भागात जनजागृतीचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. नियमित रात्रगस्तीमुळे शिकारीचे प्रकार जवळपास बंद झाल्याचे दिसून येत असून, वन्यजीव संरक्षणाला मोठी मदत होत आहे




