अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » सातारा जिल्ह्यात नवीन आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्याची संधी; ५ ते १८ ऑगस्टदरम्यान अर्ज स्वीकारणार

सातारा जिल्ह्यात नवीन आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्याची संधी; ५ ते १८ ऑगस्टदरम्यान अर्ज स्वीकारणार

सातारा जिल्ह्यात नवीन आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्याची संधी; ५ ते १८ ऑगस्टदरम्यान अर्ज स्वीकारणार

सातारा, दि. ३ : सातारा जिल्ह्यात नवीन ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू करण्यासाठी इच्छुक व्यक्ती आणि महाविद्यालयांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया ५ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सुरू राहणार असून, जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायत, नगरपंचायत आणि नगरपरिषदनिहाय रिक्त जागांची यादी, अर्जाचा नमुना तसेच अटी व शर्ती आणि आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्जाचा नमुना सातारा जिल्ह्याचे https:/www.satara.gov in या संकेतस्थळावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय यांच्या नोटीस बोर्डवर उपलब्ध करून दिल्या आहेत.

राज्य शासनाच्या विविध शासन निर्णयांनुसार आपले सरकार सेवा केंद्रांचे वितरण अधिक पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी सुधारित निवड प्रक्रिया लागू करण्यात आली आहे. त्यानुसार आता गुणांकन पद्धती, किमान पात्रता, आवश्यक पायाभूत सुविधा, मुलाखत, कार्यप्रदर्शनावर आधारित कराराचे नूतनीकरण तसेच अपात्रतेचे निकष यांचा विचार करून सेवा केंद्रांचे वाटप करण्यात येणार आहे. 

राज्यातील ज्या महाविद्यालयांकडून आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्याची मागणी केली जाईल, त्या महाविद्यालयांनाही शासनाच्या तरतुदीनुसार केंद्र मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज पूर्णपणे भरून, आवश्यक कागदपत्रांसह आपल्या गावाचा समावेश ज्या महसुली उपविभागात होतो त्या उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालयात जमा करावा.

 सातारा व जावली तालुका – उपविभागीय अधिकारी, सातारा , कोरेगाव तालुका – उपविभागीय अधिकारी, कोरेगाव , कराड तालुका – उपविभागीय अधिकारी, कराड, पाटण तालुका – उपविभागीय अधिकारी, पाटण, फलटण तालुका – उपविभागीय अधिकारी, फलटण, माण व खटाव तालुके – उपविभागीय अधिकारी, माण-खटाव व वाई, महाबळेश्वर व खंडाळा तालुके – उपविभागीय अधिकारी, वाई या ठिकाणी अर्ज जमा करावे. जिल्हा प्रशासनाने पात्रता पूर्ण करणाऱ्या इच्छुक व्यक्ती आणि महाविद्यालयांनी अर्ज सादर करण्यापूर्वी अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचूनच अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले आहे.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket