अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » देश » सुरेश दिनकर कोरडे यांची जिल्हा बँकेकडे वाटचाल? जनता अर्बन बँकेने दिली प्रतिनिधीपदाची जबाबदारी”

सुरेश दिनकर कोरडे यांची जिल्हा बँकेकडे वाटचाल? जनता अर्बन बँकेने दिली प्रतिनिधीपदाची जबाबदारी”

सुरेश दिनकर कोरडे यांची जिल्हा बँकेकडे वाटचाल? जनता अर्बन बँकेने दिली प्रतिनिधीपदाची जबाबदारी”

वाई, प्रतिनिधी : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाई येथील जनता अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने माजी अध्यक्ष सुरेश दिनकर कोरडे यांच्या नावाला बहुमताने मंजुरी देत महत्त्वाचा ठराव संमत केला आहे. या निर्णयामुळे सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहकार आणि राजकीय क्षेत्रातील समीकरणांना नवी दिशा मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे.

जनता अर्बन बँकेच्या संचालकांनी यापूर्वी सामूहिक राजीनामे दिल्याने संचालक मंडळ बरखास्त झाले होते. त्यानंतर प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या प्रीती काळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेचा प्रमुख अजेंडा सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार असलेल्या प्रतिनिधीची निवड करणे हा होता.

सभेदरम्यान सुरेश दिनकर कोरडे यांच्या नावाचा ठराव मांडण्यात आला. त्यावर झालेल्या मतदानात बहुसंख्य सभासदांनी समर्थन दर्शविल्याने त्यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे जनता अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून ते सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी एकूण २१ संचालकांची निवड केली जाते. विविध सहकारी संस्था, बँका आणि इतर पात्र संस्थांचे अधिकृत प्रतिनिधी (डेलिगेट) मतदानाचा अधिकार बजावतात.

सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांमध्ये अशी चर्चा आहे की, सुरेश दिनकर कोरडे हे बँका–पतसंस्था अथवा ओबीसी राखीव मतदारसंघातून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. मात्र, याबाबत त्यांच्याकडून अधिकृत अंतिम निर्णयाची उत्सुकता कायम आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket