राज्याध्यक्षपदी शरद बावळेकर; महाबळेश्वर तालुक्यात आनंदाचे वातावरण
नॅशनल फेडरेशन ह्युमन राईट्स कौन्सिलच्या महाराष्ट्र राज्याध्यक्षपदी नियुक्ती; विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव
महाबळेश्वर, प्रतिनिधी : सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले युवा नेतृत्व शरद बावळेकर यांची नॅशनल फेडरेशन ह्युमन राईट्स कौन्सिलच्या महाराष्ट्र राज्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने महाबळेश्वर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या नियुक्तीचे विविध स्तरांतून स्वागत करण्यात येत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.गेली 12 वर्ष ते सातत्याने कॉन्सिलची महत्वाची भूमिका राज्यात बजावत आहेत.
शरद बावळेकर हे राजकारणासोबतच समाजकारणातही लोकाभिमुख कार्य करणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणे, गरजूंना मदतीचा हात देणे, युवकांना मार्गदर्शन करणे तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे, या माध्यमातून त्यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे समाजातील विविध घटकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास आणि आदराची भावना आहे.
त्यांच्या नियुक्तीमुळे महाबळेश्वर तालुक्याच्या सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्राचा गौरव झाला असल्याची भावना व्यक्त होत आहे. मानवाधिकार संरक्षणासाठी त्यांच्या अनुभवाचा राज्यभरातील नागरिकांना निश्चितच लाभ होईल, असा विश्वासही अनेकांनी व्यक्त केला.
या निवडीबद्दल मंत्री मकरंदआबा पाटील, खासदार नितीनकाका पाटील, महाबळेश्वरचे नगराध्यक्ष सुनील शिंदे, राजेंद्रशेठ राजपुरे, संजय गायकवाड, दत्ता वाडकर तसेच विविध राजकीय, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मित्रपरिवार यांनी शरद बावळेकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली मानवाधिकार संरक्षण आणि जनहिताची चळवळ अधिक प्रभावीपणे पुढे जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.





