अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » देऊर महाविद्यालयाच्या दोन प्राध्यापकांनी जरंडेश्वर डोंगरावर गोळा केल्या तब्बल १४३९ बाटल्या

देऊर महाविद्यालयाच्या दोन प्राध्यापकांनी जरंडेश्वर डोंगरावर गोळा केल्या तब्बल १४३९ बाटल्या

देऊर महाविद्यालयाच्या दोन प्राध्यापकांनी जरंडेश्वर डोंगरावर गोळा केल्या तब्बल १४३९ बाटल्या

सातारा -शिक्षक हे आपल्या शिकवणुकीतून फक्त आदर्श विद्यार्थीच घडवत नाहीत तर प्रबोधनाच्या आणि प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून सक्षम समाजनिर्मिती करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडतात. समाजनिर्मितीची ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन आपल्या कृतीतून श्री क्षेत्र जरंडेश्वर डोंगरावर काल प्लॅस्टिक निर्मूलन मोहिम आणि स्वच्छता उपक्रम राबवून डॉ. कमलसिंग क्षत्रिय आणि प्रा.सुर्यकांत अदाटे या प्राध्यापकांनी आपल्या प्रेरणादायक कृतीने समाजापुढे एक आदर्श ठेवलेला आहे. काल तीन तासात त्यांनी जरंडेश्वर डोंगरावरील मंदिर परिसरातील तब्बल १४३९ प्लॅस्टिक बाटल्या संकलन करून पायथ्याला आणल्या.

श्री क्षेत्र जरंडेश्वर मारुती मंदिरात प्रत्येक शनिवारी भक्तगण श्री जरंडेश्वर मारुतीरायाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. येताना पाणी बॉटल आणि प्लॅस्टिक असणाऱ्या कुरकुरे तसेच खाद्यपदार्थ रॅपर आणत असतात आणि खाऊन किंवा पाणी पिऊन बॉटल तेथेच टाकत असतात. या बाटल्यांचा आणि प्लॅस्टिक रॅपर हे कुजत नसल्याने त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो तसेच ते जाळण्याचा प्रयत्न केल्यास प्रदुषण वाढते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन प्रा.संभाजीराव कदम महाविद्यालयाच्या डॉ.कमलसिंग क्षत्रिय आणि सहा.प्रा.सुर्यकांत अदाटे या पर्यावरण संवर्धक दोन प्राध्यापकांनी प्लॅस्टिक निर्मूलनाची ही मोहीम जवळपास तीन तास जरंडेश्वर मंदिर परिसर आणि डोंगरावर राबविली. 

प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम, त्याचा पर्यावरण तसेच मानवी जीवनावर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेऊन महाविद्यालयाने जरंडेश्वर डोंगरावरील प्लॅस्टिक निर्मूलनाचे उच्चाटन करणे या उद्देशाने या प्लॅस्टिक निर्मुलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सातारा रोडमार्गे जरंडेश्वर डोंगर चढत चढाईमार्गावरील पायऱ्यांच्याजवळ पडलेल्या प्लॅस्टिक बाटल्या गोळा करत त्यांनी संकलनास सुरुवात केली. त्यानंतर जरंडेश्वर मंदिर परिसरातील, मंदिराच्या मागील परिसर, गोशाळा व बारव परिसर, समर्थ रामदास गुंफा परिसरात जवळपास तीन तास प्लॅस्टिक बाटल्यांचे संकलन करण्यात आले. त्यानंतर या सर्व बाटल्या जरंडेश्वर पायथ्याला आणून त्या रिसायकलिंगसाठी देण्यात आल्या.

पर्यावरणातील वाढता प्लॅस्टिकचा वापर पाहता शनिवारी जरंडेश्वर परिसरातील स्वच्छता ही आपली सर्वांची जबाबदारी असून आपण त्यात पुढाकार घेतला पाहिजे या विधायक भुमिकेतून डॉ. कमलसिंग क्षत्रिय व प्रा. सूर्यकांत अदाटे हे गेली दोन वर्षे सातत्याने या मंदीर परिसरात आणि जरंडेश्वर डोंगरात स्वच्छता तसेच प्लॅस्टिक संकलनासाठी कार्यरत आहेत. तसेच जरंडेश्वरवर येणाऱ्या भक्तगणाना स्वच्छतेच्या विषयावर जनजागृती करत असतात. या दोन्ही प्राध्यापकांना सामाजिक कार्याची आवड असून हे पर्यावरण व गडसंवर्धन कार्यात अग्रेसर असतात. स्वच्छता जागृतीसाठी त्यांनी जरंडेश्वर डोंगर केंद्रस्थानी मानून या श्री क्षेत्र जरंडेश्वर डोंगर स्वच्छता करण्याचे ध्येय ठेवलेले आहे. या ठिकाणी जय जरंडेश्वर जीर्णोद्धार समिती आणि पाडळी येथील जरंडेश्वर जेष्ठ नागरिक संघसुद्धा हिरीरीने कार्यरत असतो. त्यांचेही सहकार्य यांना लाभत असते.

‘स्वच्छता हीच सेवा’ या भावनेतून श्री क्षेत्र जरंडेश्वर मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून सामाजिक परिवर्तनाचे केंद्रही होऊ शकते, याची जाणीव जनतेला झाली पाहिजे. त्यामुळे येणाऱ्या श्रावणातील प्रत्येक शनिवारी स्वच्छतेचा आणि प्लॅस्टिकमुक्तीचा संदेश देऊन स्वतः स्वच्छता व प्लॅस्टिक निर्मूलन मोहीम राबविणार असल्याचे असल्याचे डॉ. कमलसिंग क्षत्रिय व प्रा. सूर्यकांत अदाटे यांनी सांगितले.

श्रावणात श्री जरंडेश्वर दर्शनाच्या निमित्ताने येणाऱ्या भक्तगणांनी आपल्या बरोबर आणलेले प्लॅस्टिक बाटल्या किंवा कुरकुरे पाकिटे डोंगरावर इकडे तिकडे न टाकता स्वतः घेऊन जाणे अधिक योग्य व संस्कारक्षम बाब आहे तसे न जमल्यास येथील कचराकुंड्यांत व्यवस्थित टाकल्यास या धार्मिक आणि पवित्र स्थळावर स्वच्छता राहील आणि प्लॅस्टिक प्रदूषण होणार नाही. श्रावणात या उपक्रमात ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी आम्हाला संपर्क करावा. 

सहा.प्रा. सुर्यकांत अदाटे, पर्यावरणवादी प्राध्यापक

श्रावणात श्री जरंडेश्वर डोंगरावर असणाऱ्या औषधी वनस्पतींची ओळख या प्लॅस्टिक निर्मुलन जनजागृती मोहिमेमुळे होत असते. अशा सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांत या परिसरातील सेवाभावी संस्थांनी सहभागी झाल्यास या मोहिमेस आणखी बाल मिळेल. डॉ.कमलसिंग क्षत्रिय, कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना, देऊर

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket