अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » पर्यटन » द क्लब”च्या गोल्फ कोर्स मैदानावर क्रीडा संकुलाचे आरक्षण !विकास आराखड्यात किरकोळ बदल करण्याचा सर्वानुमते निर्णय

द क्लब”च्या गोल्फ कोर्स मैदानावर क्रीडा संकुलाचे आरक्षण !विकास आराखड्यात किरकोळ बदल करण्याचा सर्वानुमते निर्णय

द क्लब”च्या गोल्फ कोर्स मैदानावर क्रीडा संकुलाचे आरक्षण !विकास आराखड्यात किरकोळ बदल करण्याचा सर्वानुमते निर्णय

महाबळेश्वर -महाबळेश्वर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत हेरिटेज ग्रेड १ मधील ”द क्लब”च्या गोल्फ कोर्स मैदानावरील अनधिकृत अतिक्रमण वृक्षतोडीचा विषय सभेच्या पटलावर आला या महत्त्वपूर्ण विषयांवर सत्ताधारी व विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये याविषयावर सखोल चर्चा झाली नागराध्यक्ष सुनील शिंदे यांनी आपले मत मांडले त्यानंतर या हेरिटेज मिळकतीत ‘नो डेव्हलपमेंट झोन’ करण्यासह वृक्षतोडी बाबत कठोर पावले उचलण्यावर एकमत झाले असून विकास आराखड्यात किरकोळ बदल करून गोल्फ कोर्स मैदानावर क्रीडा संकुलाचे आरक्षण टाकण्याबाबतचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला महाबळेश्वर पालिकेने नोटीस बजावून शेड कुंपण व गेट काढले दरम्यान या कारवाई विरोधात द क्लब प्रशासनाने उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात धाव घेत तात्पुरता स्थगिती आदेश आणला आता मुख्याधिकारी योगेश पाटील आपले म्हणणे न्यायालयात सादर करणार आहेत.

                    महाबळेश्वर पालिका हद्दीतील हेरिटेज (वारसा स्थळ) ग्रेड -१ मध्ये समाविष्ट ”द क्लब महाबळेश्वर”च्या मिळकत सि.स.नं.११७ ,११८ ”गोल्फ कोर्स’ वरील वृक्षतोड,उत्खनन,भलेमोठे अनधिकृत शेड,नवीन रस्ते निर्मिती,चहुबाजूनी केलेले अनधिकृत तारेचे कुंपण असा गंभीर प्रकार गेल्या महिन्यात प्रांताधिकारी डॉ योगश खरमाटे यांच्या स्थळपाहणीत उघडकीस आला होता पालिकेस जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या आदेशाने कारवाई करत कोणतीही परवानगी न घेता अनाधिकृतपणे २० मीटर लांब x १० मीटर रुंदीचे पत्राशेडचे बांधकाम जेएसीबीच्या साहाय्याने उध्वस्त करण्यात आले मैदानाच्या चहुबाजूनी असलेले लोखंडी अँगल वापरून लांबी ११४० मी x उंची २.४० मी. या मापामध्ये लोंखडी जाळीचे कुंपनासह पाडण्यात आले यातील केवळ तीस मीटर कुंपण पाडण्याचे बाकी होते प्रशासनाने केलेल्या कारवाईनंतर या विषयावर सर्वसाधारण सभेत चर्चेस सुरुवात झाली सभेदरम्यान अनेक नगरसेवकांनी द क्लब च्या गोल्फ कोर्स मैदानावरील वृक्षतोडीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या महाबळेश्वरमध्ये अशा प्रकारे वृक्षतोड होणे ही चिंतेची बाब असून भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी कठोर धोरण स्वीकारण्याची गरज असल्याचे मत अनेक सदस्यांनी व्यक्त केले.प्रारंभी जेष्ठ नगरसेवक किसनशेठ शिंदे यांनी वृक्षतोडीवर कठोरात कठोर कारवाई करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे सांगून अश्या जागेवर नो डेव्हलपमेंट झोन करण्याबाबत निर्णय सभेने घ्यावा अशी आग्रही मागणी केली तसेच एक हजार रुपयांचा दंड भरून वृक्षतोड करणारा मोकळा होतो यासाठी करहोत पावले उचलण्याची मागणी केली.

               द क्लब च्या गोल्फ कोर बाबत विरोधी पक्षनेते कुमार शिंदे यांनी,पालिकेने हे प्रकरण गांभीर्याने न घेतल्यामुळे हा प्रकार घडल्याचे सांगितले तसेच स्वरसदाहरण सभेच्या पटलावर विषय घेतल्याबद्दल नगराध्यक्ष सुनील शिंदे यांचे आभार मानले द क्लब ने पालिकेस विविध कार्यक्रमांना मैदान देऊन मदत केली असली तरी अश्या हेरिटेज दर्जाच्या मिळकतीत केलेल्या वृक्षतोडीसह अतिक्रमणांचे कुणीही समर्थान करणार नसल्याचे सांगून पालिकेने कडक कारवाई करत एक उदाहरण सेट करावे जेणेकरून कुणीही यापुढे असे प्रकार करणार नाही पालिकेचा दबदबा राहिलाय हवा असे मत व्यक्त केले.नगरसेवक ॲड. संजय जंगम यांनी देखील आपले मत व्यक्त करताना गोल्फ मैदानाच्या जागेवर क्रीडा संकुलाचे आरक्षण टाकण्याचा प्रस्ताव सभागृहापुढे मांडला. शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता तसेच युवकांना खेळासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रस्ताव अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी स्पष्ट केले नगरसेवक रवींद्र कुंभारदरे यांनी आपली भूमिका मांडली.

               मुख्याधिकारी योगेश पाटील यांनीही या विषयावर प्रशासनाची भूमिका स्पष्ट करताना द क्लब प्रशासनानं दिलेली नोटीस त्यानंतर केलेल्या कारवाईची सविस्तर माहिती दिली तसेच द क्लब ने पालिकेविरोधात उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात धाव घेत तत्परता स्थगिती आदेश आणल्याचे सांगितले मात्र त्याआधीच पालिकेने शेड व कुंपण उध्वस्थ करण्याची कारवाई केल्याचे नमूद करून न्यायालयाच्या पुढील तारखेस महाबळेश्वर पालिकेच्यावतीने मुख्याधिकारी योगेश पाटील हे आपले म्हणणे सादर करणार आहेत.

                     महाबळेश्वर पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये विकास आराखड्यात किरकोळ बदल करून या गोल्फ कोर्स मैदानावर क्रीडा संकुलासाठी आरक्षण टाकण्याबाबतचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला असून असे झाल्यास महाबळेश्वर तालुक्यातील तरुणांना एक हक्काचे मैदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आता यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची गरज असलयाचे मत व्यक्त होत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket