अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » प्रशासकीय » महाबळेश्वर शहरातील नो-हॉकर झोनवरील अनधिकृत टपऱ्यांवर कारवाईचे एकमत; पालिका प्रशासनाच्या कृतीकडे लक्ष

महाबळेश्वर शहरातील नो-हॉकर झोनवरील अनधिकृत टपऱ्यांवर कारवाईचे एकमत; पालिका प्रशासनाच्या कृतीकडे लक्ष

महाबळेश्वर शहरातील नो-हॉकर झोनवरील अनधिकृत टपऱ्यांवर कारवाईचे एकमत; पालिका प्रशासनाच्या कृतीकडे लक्ष

महाबळेश्वर प्रतिनिधी –महाबळेश्वर शहरातील नो-हॉकर झोनमध्ये वाढलेल्या अनधिकृत टपऱ्या आणि अतिक्रमणाचा मुद्दा अखेर महाबळेश्वर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गाजला. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्व नगरसेवकांनी या प्रश्नावर एकमताने चर्चा करत नो-हॉकर झोनमधील सर्व अनधिकृत अतिक्रमणे हटविण्याचा ठराव मंजूर केला. त्यामुळे आता या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पालिका प्रशासन मुहूर्त कधी काढणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वर शहरातील मुख्य बाजारपेठ, बसस्थानक परिसर, एसटी डेपो, सुभाष चौक ते महात्मा गांधी रोड आणि हॉटेल पॅनोरमा परिसर हा नगरपरिषदेकडून नो-हॉकर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसेच ब्रिटिशकालीन ऐतिहासिक चर्च परिसरात कोणत्याही प्रकारच्या हातगाड्या अथवा टपऱ्या उभारण्यास बंदी आहे. मात्र प्रत्यक्षात याच परिसरात चायनीज, शॉवरमा, चहा व फास्टफूडच्या अनधिकृत टपऱ्या मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे चित्र आहे.

हॉटेल पॅनोरमा समोरील परिसरात उभारण्यात आलेल्या काही टपऱ्यांबाबतही विविध चर्चा सुरू आहेत.पर्यटन हंगामात लाखो पर्यटक महाबळेश्वरला भेट देतात. अशावेळी मुख्य रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत टपऱ्यांमुळे वाहतूक कोंडी, अस्वच्छता, पार्किंगची समस्या आणि पादचाऱ्यांना होणारा त्रास वाढत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. त्यामुळे शहराच्या पर्यटन प्रतिमेलाही धक्का बसत असल्याची भावना व्यापारी आणि नागरिक व्यक्त करत आहेत.

दरम्यान, तत्कालीन मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी या परिसरातील अनधिकृत अतिक्रमणांवर धडक कारवाई करून टपऱ्या हटवल्या होत्या. मात्र त्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमणे उभी राहिल्याने प्रशासनाच्या सातत्यपूर्ण कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

 

याच पार्श्वभूमीवर झालेल्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांनी नो-हॉकर झोनची काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त केली. शहरातील अनधिकृत टपऱ्या व अतिक्रमणे तातडीने हटविण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्यामुळे आता नगरपरिषद प्रशासन या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करून कारवाई करणार की निर्णय केवळ कागदावरच राहणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

सभेतील निर्णयानंतर आता सर्वांचे लक्ष पालिका प्रशासनाच्या पुढील पावलाकडे लागले आहे. नो-हॉकर झोनमधील अनधिकृत टपऱ्यांवर प्रत्यक्ष कारवाईचा मुहूर्त कधी निघणार, याची प्रतीक्षा महाबळेश्वरकर, व्यापारी आणि पर्यटक करत आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket