अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » यशोदा टेक्निकल कॅम्पसला सुप्रसिद्ध गायक विराज जोशी यांची सदिच्छा भेट

यशोदा टेक्निकल कॅम्पसला सुप्रसिद्ध गायक विराज जोशी यांची सदिच्छा भेट

यशोदा टेक्निकल कॅम्पसला सुप्रसिद्ध गायक विराज जोशी यांची सदिच्छा भेट

सातारा: भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या समृद्ध संगीत परंपरेचा प्रेरणादायी वारसा जपत सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक विराज जोशी यांनी यशोदा टेक्निकल कॅम्पस, सातारा येथे सदिच्छा भेट दिली. या भेटीमुळे कॅम्पसमध्ये संगीत, संस्कार आणि सांस्कृतिक मूल्यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.

याप्रसंगी यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. प्रा. डॉ. दशरथ सगरे यांनी विराज जोशी यांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक स्वागत केले. संस्थेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

भेटीदरम्यान भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या सातारा दौऱ्यांच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. साताऱ्यातील त्यांच्या संस्मरणीय मैफिली, रसिकांशी असलेले आत्मीय नाते, संगीत साधनेतील त्यांची निष्ठा आणि साधेपणा याविषयी विराज जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. पंडितजींच्या सुरसाधनेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी प्रत्येक संगीतप्रेमीची असल्याचे त्यांनी सांगितले. या आठवणींमुळे उपस्थितांना पंडितजींच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि त्यांच्या अद्वितीय संगीत वारशाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.

यावेळी यशोदा टेक्निकल कॅम्पसमधील शिक्षकांनी भारतीय शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा, पंडित भीमसेन जोशी यांच्या संगीत वारशाचे महत्त्व आणि सुरसाधनेची प्रेरणा यांविषयी मार्गदर्शन घेतले. संगीत ही केवळ मनोरंजनाची कला नसून व्यक्तिमत्त्व विकास, संवेदनशीलता, शिस्त आणि संस्कार घडविणारे प्रभावी माध्यम असल्याचा विचार यावेळी मांडण्यात आला.

यावेळी यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. प्रा. डॉ. दशरथ सगरे यांनी विराज जोशी यांना शुभेच्छा देताना म्हणाले, “आमचे विद्यार्थी, शिक्षक आणि संपूर्ण यशोदा परिवार आपल्या सुरांचा मनापासून चाहता आहे. आम्ही सर्वजण आपल्या संगीत प्रवासाचे अभिमानी अनुयायी आहोत. आपल्या कलेतून भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा अधिक समृद्ध होत राहो. आपण उत्तरोत्तर यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचावे आणि लवकरच आपणही भारताचे रत्न बनावे, हीच आमच्या सर्वांची मनःपूर्वक सदिच्छा.”

या प्रसंगामुळे उपस्थितांना भारतीय सांगीतिक परंपरेचा अभिमान तर वाटलाच, शिवाय संस्कृती, संवेदनशीलता आणि जीवनमूल्ये जपण्याची प्रेरणाही मिळाली. यशोदा टेक्निकल कॅम्पस विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच कला, संस्कृती आणि मूल्याधिष्ठित शिक्षणालाही तितकेच महत्त्व देत असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.

यावेळी संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket