Home » राज्य » शेत शिवार » कोयना धरणातून उद्या १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोयना धरणातून उद्या १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोयना धरणातून उद्या १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोयनानगर, दि. २८ : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी उद्या बुधवार, दि. २९ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ वाजता धरण पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू करून १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.

पावसाचे प्रमाण तसेच धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकनुसार सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार बदल होऊ शकतो, अशी माहिती कोयना सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे.

धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीपात्रालगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठावरील गावांतील नागरिकांनी खबरदारी घ्यावी तसेच कोणत्याही परिस्थितीत नदीपात्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. नदीकाठावरील ग्राम प्रशासन व संबंधित यंत्रणांनी याची नोंद घेऊन आवश्यक ती दक्षता घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा दानशूर दाम्पत्याकडून विद्यार्थ्यांना भेट, मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला रंगत रांजणी

Live Cricket