कै.अजितदादा पवार जयंती सप्ताहानिमित्त नायगावात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन उद्या वृक्षारोपण, मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरासह विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप
केळघर प्रतिनिधी –राज्याचे माजी उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांच्या जयंती सप्ताहानिमित्त नायगाव ता. कोरेगाव येथे उद्या मंगळवारी (ता:२८)विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती कोरेगाव तालुका शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रमोद धुमाळ यांनी दिली. उद्या मंगळवारी सकाळी नऊ वाजता वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्यानंतर मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर व चष्मे वाटप कार्यक्रम होणार आहे.
त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप करण्यात येणार आहे. तरी वरील सर्व कार्यक्रमांचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन प्रमोद भाऊ धुमाळ युवा मंच, ग्रामपंचायत नायगाव ,विकास सेवा सोसायटी व ग्रामस्थ नायगाव यांनी केले आहे.




