अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » बँकिंग » सहकार भूषण धन्वंतरी पतसंस्थेची ३७ वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न व १२% लाभांश जाहीर.

सहकार भूषण धन्वंतरी पतसंस्थेची ३७ वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न व १२% लाभांश जाहीर.

सहकार भूषण धन्वंतरी पतसंस्थेची ३७ वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न व १२% लाभांश जाहीर.

सहकार भूषण धन्वंतरी पतसंस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थापक चेअरमन डॉ. रविंद्र भोसले यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेतील सर्व विषयांना सभासदांनी सर्वानुमते मंजुरी दिली.

प्रथम धन्वंतरी देवतेचे पुजन जेष्ठ सभासद डॉ. संजोग कदम, डॉ. मधुकर सांगळे, श्री. बापूसो उथळे श्री. सुजित शेख यांचे शुभहस्ते करण्यात आले. सभेची सुरूवात राष्टगीताने करण्यात आली. त्यानंतर अहवाल वर्षात दिवंगत झालेले संस्थेचे सभासद, ठेवीदार, सेवक, हितचिंतक यांचे निधनाबदद‌ल श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.याप्रसंगी बोलताना संस्थापक चेअरमन डॉ. रविंद्र भोसले म्हणाले की, सहकार क्षेत्रात सक्षम व आदर्श पतसंस्था म्हणून मा.राज्यपाल यांचे हस्ते “सहकार भूषण” पुरस्कार देवून गौरविलेल्या धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्थेला दि. ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात व्यावसायिक व्यवस्थापनाचा अंगीकार करुन व पारदर्शक कारभाराच्या जोरावर सन २०२५-२०२६ मध्ये ढोबळ नफा रु. ५ कोटी ३७ लाख झाला असून सर्व कायदेशीर तरतूदी करुन संस्थेने रु ५ कोटी ०४ लाख इतका निव्वळ नफा मिळविला आहे. सध्याच्या स्पर्धात्मक युगात आपल्या संस्थेस झालेला नफा हा नक्कीच सुयोग्य व्यवस्थापन व उत्कृष्ट कारभाराचे गमक आहे. यामध्ये आपल्या सर्वाचे मोलाचे सहकार्य, सहभाग आहे याची आम्हांस जाणीव आहे. भविष्यातही संस्थेची सक्षमता व स्थैर्य असेच भक्कम राहणेचे दृष्टीने संस्थेने नियमाप्रमाणे एन.पी.ए. ची १००% तरतुद केली आहे. तसेच अहवाल वर्षात एनपीए कर्जखात्यांची परीणामकारक वसुली करून नेट एनपीए०% तर ग्रॉस एनपीए १२% राखण्यात संस्थेला यश आले आहे. तसेच संस्थेतील प्रत्येक ठेवीदाराची ठेव १००% सुरक्षित असलेबाबतची खात्रीही त्यांनी यावेळी दिली तसेच संस्थेने सीबीएस कार्यप्रणाली सुरू केली असून संस्थेच्या ग्राहकांसाठी मोबाईल अॅप विकसीत केले आहे.

त्याचा लाभ सर्व ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच सभासदांना १२% लाभांश जाहीर होताच सर्व सभासदांनी टाळयांच्या गजरात स्वागत केले. तसेच थकीत कर्जदार व त्यांचे जामीनदार यांनी थकहप्ते भरून संस्थेस सहकार्य करावे व कठोर कायदेशीर कारवाई टाळावी अशी विनंती केली. व संस्थेच्या नवीन प्रशासकीय इमारतीची गरज व महत्व विषद करून सभासदांच्या सहकायनि भव्य व गरजेची अशी सर्व सोयीयुक्त इमारत पुढील ३ वर्षात उभारण्याचा मानस व्यक्त केला त्यास सर्व सभासदांनी सर्वानुमेत मंजुरी दिली.

संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना ते पुढे म्हणाले की, सहकार खात्यांचे सर्व निकष, मानांकने इ. ची पूर्तता संस्था प्रत्येक वर्षी करतेच. यावर्षीसुध्दा ऑडीट गुणतक्त्यातील निकषांची पूर्तता संस्थेने पूर्ण केली असुन संस्थेस सर्वोच्च असा ऑडीट वर्ग ‘अ’ मिळाला आहे. ते पुढे म्हणाले की, व्हा. चेअरमन डॉ. कांत फडतरे व सर्व संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीहरी डिंगणे, सहा. उपमुख्य कायकारी अधिकारी सौ. अलका मुरूमकर, वसुली अधिक्षक श्री. शंकर चव्हाण व त्यांचे सर्व सहकारी अधिकारी, वसुली अधिकारी या सर्वांच्या प्रयत्नांमुळे उत्तम कर्जवसुली झाली त्याबदद्ल त्यांचे विशेष अभिनंदन करतो. तसेच माझे रजेच्या कालावधीमध्ये व्हा. चेअरमन डॉ. कांत फडतरे यांनीही सर्व संचालकांच्या सहकार्याने संस्थेचे कामकाज अतिशय उत्तमरित्या पार पाडले याबददल त्यांचेही विशेष आभार मानतो. तसेच सर्व संचालक व कर्मचारी यांना वेळोवेळी प्रशिक्षण देठन संस्थेचा कारभार नियोजनबध्द व प्रभावीपणे निर्णय घेवून केला आहे त्यामुळे संस्थेची प्रतिमा समाजात उंचावली आहे. तसेच संस्थेच्या मुख्य कार्यालयासह सहा शाखा संपूर्ण संगणकीकरणासह स्वमालकीच्या वास्तूत कार्यरत आहेत. सभासद, ठेवीदार, कर्जदार, कष्टाळू सेवक यांचे सहकायनिच आपणांला हे यश प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले व याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

व्हा. चेअरमन डॉ. कांत फडतरे म्हणाले की, संस्थेच्या प्रगतीत योगदान दिल्याबददल सर्व सहकारी संचालकांचे व सेवक वर्गाचे त्यांनी अभिनंदन करून आभार मानले. तसेच चालू वर्षी मा. संचालक मंडळाने एकत्रित व्यवसाय रू. ५०० कोटी, ठेवी रू. २८५ कोटी, कर्जे रू. २१५ कोटी करण्याचे उदिदष्ट ठेवले आहे संस्थेच्या व्यवसायात वाढ होण्यासाठी सभासदांनी आपल्या नातेवाईक, मित्रपरीवार व कुटुंबाला सभासदत्व व संस्थेच्या विविध सेवा घेण्यास प्रवृत्त करावे असे आवाहन केले. सभासदांना संस्थेचे भागभांडवल वाढीसाठीही जादा भागभांडवल

घेणेसाठी आवाहन करून सभासदांचे भागभांडवलासाठी नेहमीच ठेवीचे व्याजदरापेक्षा किमान २% जास्त लाभांश देण्याचे आश्वासन दिले. सर्व सभासदांनी तसेच संस्थेच्या हमखास उत्पन्न मिळवून देणारे व कमी जोखीम असलेल्या सोने तारण कर्जामध्ये वाढ होणेसाठी मिळत असलेला भरघोस प्रतिसाद असाच पुढे रहावा व इतर सर्व पतसंस्थांपेक्षा तसेच काही बँकांपेक्षाही आपल्या संस्थेचे कर्जाचे व्याजदर अत्यल्प असून कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग फी आपली संस्था घेत नाही तसेच नियमित कर्जपरतफेड करणा-या सभासदांना १% कर्जव्याजदरात सुट (रिबेट) योजनाही कार्यान्वित केली आहे. त्यामुळे विविध कर्ज योजनेतुन सभासदांनी अर्थसहाय घेण्याचे आवाहन केले. क्ती आराखडयानुसार कामकाज करुन आवश्यक तेवढाच खर्च करुन काटकसरीचे धोरण राबविल्यामुळे व्यवस्थापन खर्चाचे प्रमाण फक्त १.४७% इतके अत्यल्प राखले आहे तसेच संस्थेने सीबीएस संगणक प्रणाली कार्यान्वित केली असून त्यामुळे ग्राहकांना एसएमएस बँकीग, मोबाईल बँकीग, आयएमपीएस, एनइएफटी व आरटीजीएस सारख्या अत्याधुनिक सुविधांचा लाभ सभासद घेत आहेत संस्थेचे अधिकारी, कर्मचारी यांनी केलेले अहोरात्र कष्ट तसेच कार्यतत्पर, कर्तव्यदक्ष संचालक मंडळ. जनतेचा संस्थेवरील दृढ विश्वास यामुळेच संस्था दिवसेंदिवस उल्लेखनीय कार्य करीत आहे. स्थापनेपासून अ वर्ग, प्रतिवर्षी लाभांश अशा अनेक बाबीमुळे लोकांचा संस्थेवरील विश्वास अधिक दृढ होत आहे. संस्थेच्या विविध कर्जयोजनांचाही लाभ सर्व सभासदांनी घोवून संस्था व्यवसायवाढीस हातभार लावण्याचे आवाहन त्यांनी केले. माहीती व तंत्रज्ञानाचा वापर संस्थेच्या सभासद, ग्राहकांना व्हावा यासाठी संस्थेने स्वतःची वेबसाईट कार्यान्वित केली असून त्याचाही लाभ सर्वांनी घ्यावा न उपस्थितांचे आभार मानले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय पवार यांनी विषयपत्रिकेचे वाचन करुन उपस्थित सभासदांचे शंका निरसन केले. याप्रसंगी संचालक डॉ. अरविंद काळ, डॉ. शिरीष भोईटे, डॉ. शकील अत्तार, डॉ. हेमंत शिंदे, डॉ. अभिजीत भोसले, डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. श्रीरंग डोईफोडे, डॉ. सौ. सारीका मस्कर, डॉ. सौ. हर्षला बाबर, डॉ. जयदीप चव्हाण, डॉ. नारायण तांबे, अॅड, सुर्यकांत देशमुख, व उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीहरी डिगणे सभासद, अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket