पै. करण शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता सैनिकांचा सन्मान गौरव गणेश घुले फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम; नगराध्यक्ष सुनील शिंदे व मुख्याधिकारी योगेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती
महाबळेश्वर : पै. करण शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने गौरव गणेश घुले फाउंडेशनच्या वतीने महाबळेश्वर नगरपरिषदेतील सर्व सफाई व आरोग्य कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास महाबळेश्वरचे नगराध्यक्ष सुनील शिंदे तसेच महाबळेश्वर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश पाटील प्रमुख उपस्थित होते. यावेळी स्वच्छता व आरोग्य सेवेत अहोरात्र कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव करून त्यांना भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या.
महाबळेश्वरसारख्या आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळाची स्वच्छता आणि आरोग्य व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी सफाई व आरोग्य कर्मचारी सातत्याने मेहनत घेत असतात. त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेला हा उपक्रम सर्व स्तरांतून कौतुकास पात्र ठरत असून, सामाजिक बांधिलकी जपणारा आदर्श उपक्रम म्हणून त्याची प्रशंसा होत आहे.

पै. करण शिंदे
“वाढदिवस समाजासाठी” हा संदेश देत पै. करण शिंदे यांनी स्वतःचा वाढदिवस सफाई व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सन्मानासाठी समर्पित केला. समाजातील कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरत असून, सामाजिक जाणीव जोपासणारा आदर्श म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.





