अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडलं आंदोलन पूर्णपणे थांबणार नाही

सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडलं आंदोलन पूर्णपणे थांबणार नाही 

सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडलं आंदोलन पूर्णपणे थांबणार नाही 

नवी दिल्लीः NEET पेपर लीक प्रकरणावर देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाला मोठं वळण मिळालं आहे. तब्बल 26 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी अखेर उपोषण मागे घेतलं. 

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हा निर्णय घेतला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशाला उद्देशून व्हिडिओ संदेश जारी करत NEET पेपर लीक प्रकरणावर प्रथमच सार्वजनिक भूमिका मांडली. मात्र, या घडामोडींनंतरही आंदोलन पूर्णपणे थांबणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

 अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत स्पष्ट केलं की, सोनम वांगचूक यांनी उपोषण संपवलं असलं तरी जंतर-मंतरवरील शांततापूर्ण आंदोलन सुरूच राहील.

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “सोनम सरांनी 26 दिवसांचं उपोषण संपवल्याबद्दल आम्हाला दिलासा वाटतो. त्यांच्या असामान्य धैर्याबद्दल आणि त्यागाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी संपूर्ण देशाचं लक्ष या प्रश्नाकडे वेधलं. त्यांचं आयुष्य देशासाठी अत्यंत मौल्यवान आहे.”

याचबरोबर त्यांनी स्पष्ट केलं की, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी मान्य होईपर्यंत कॉक्रोच जनता पार्टी चे जंतर-मंतरवरील आंदोलन सुरूच राहणार आहे.

अभिजीत दिपके यांनी पुन्हा एकदा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर राजकीय आणि नैतिक जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. NEET पेपर लीक प्रकरणात जबाबदारी स्वीकारून त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी भूमिका CJP ने कायम ठेवली आहे.यामुळे सोनम वांगचूक यांच्या उपोषणाची सांगता झाली असली तरी आंदोलनाचा पुढील टप्पा आता जंतर-मंतरवर सुरू राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket