अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » ठळक बातम्या » आरोग्य » आता साताऱ्यात ‘सर्व उपचार पद्धती’ एकाच छताखाली!

आता साताऱ्यात ‘सर्व उपचार पद्धती’ एकाच छताखाली!

आता साताऱ्यात ‘सर्व उपचार पद्धती’ एकाच छताखाली!

सातारा दि : २३ सातारा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये होमिओपॅथिक बाह्यरुग्ण विभाग व कॅन्सर पॅलिएशन सेंटरचा शुभारंभ कोविड महामारीनंतर आयुर्वेद आणि होमिओपॅथीच्या प्रभावी उपचारांविषयी सर्वसामान्यांमध्ये जागरूकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः विषाणूजन्य आजार, मनोकायिक विकार तसेच स्वयंप्रतिकार शक्तीशी (Autoimmune) संबंधित आजारांमध्ये होमिओपॅथी उपचारपद्धती उपयुक्त ठरत असल्याचे दिसून आले आहे. ही गरज लक्षात घेऊन सातारा डायग्नोस्टिक सेंटर येथे होमिओपॅथिक बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात येत असून त्याचे उद्घाटन शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी सांयकाळी ५ वाजता होणार आहे.

सातारा डायग्नोस्टिक सेंटरचे कार्यकारी संचालक व सुप्रसिद्ध फिजिशियन डॉ. सुरेश शिंदे (एम.डी. मेडिसिन) यांनी सांगितले की, “२१व्या शतकात कोणती उपचारपद्धती श्रेष्ठ किंवा कनिष्ठ यावर वाद घालण्यापेक्षा प्रत्येक उपचारपद्धतीतील चांगल्या बाबींचा समन्वय करून रुग्णांना अधिक प्रभावी व सुरक्षित आरोग्यसेवा देणे हेच डॉक्टरांचे खरे कर्तव्य आहे. प्रत्येक उपचारपद्धतीच्या मर्यादा लक्षात घेऊन योग्य आजारात योग्य उपचारपद्धतीचा वापर करणे हेच रुग्णहिताचे आहे.”

सातारा डायग्नोस्टिक सेंटरची स्थापना करतानाच डॉ. शिंदे आणि पुण्यातील जागतिक कीर्तीचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांची संकल्पना होती की, मोठ्या शहरांप्रमाणे साताऱ्यातही सर्व उपचारपद्धती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात. या संकल्पनेची पूर्तता म्हणून आता होमिओपॅथिक विभाग सुरू होत आहे.

या विभागांतर्गत कॅन्सर पॅलिएशन सेंटर (Cancer Palliation Centre) देखील सुरू करण्यात येणार असून स्वयंप्रतिकार शक्तीशी संबंधित आजार, संधिवात, सोरायसिस, कोड (पांढरे डाग), अल्सरेटिव्ह कोलायटिस, थायरॉईड विकार, लायकेन प्लॅनस तसेच कर्करोग रुग्णांसाठी वेदनाशामक उपचार उपलब्ध असतील.

रुग्णसेवेसाठी सातारा, पुणे आणि मुंबई येथे कार्यरत असलेले प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. जवाहरलाल शाह व डॉ. सारा शाह हे दर बुधवार व शनिवार सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत उपलब्ध राहणार आहेत.

उद्घाटन समारंभ डॉ. जगदीश हिरेमठ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार असून मुंबईतील नामांकित होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. जसवंत पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. डॉ.जसवंत पाटील यांनी ग्रँट मेडिकल कॉलेज, मुंबई येथून एमबीबीएस तसेच केईएम रुग्णालयातून एम.डी. (Chest) पदवी संपादन केली आहे. कोविड काळात त्यांनी होमिओपॅथीच्या माध्यमातून अनेक गंभीर रुग्णांवर यशस्वी उपचार केले असून त्यांच्या कार्याचा अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे.

या नव्या होमिओपॅथिक केंद्राचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन डॉ. सुरेश शिंदे यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket