अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » धावडशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शुभांगीताई पवार यांची बिनविरोध निवड

धावडशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शुभांगीताई पवार यांची बिनविरोध निवड

धावडशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शुभांगीताई पवार यांची बिनविरोध निवड

महिला वर्गात नवचैतन्य, विविध स्तरांतून निवडीबद्दल कौतुक 

धावडशी-(गणेश पवार)- धावडशी, ता. सातारा येथील धावडशी ग्रामपंचायतीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्त्वाखालील शेतकरी विकास पॅनेलच्या सौ. शुभांगीताई रामदास पवार यांची नुकतीच उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीने गावात महिला वर्गात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायतीच्या बैठकीत झालेल्या निवड प्रक्रियेत त्यांची नवनिर्वाचित उपसरपंच म्हणून जाहीर निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे सर्व राजकीय, सामाजिक स्तरांतून विशेष कौतुक होत असून ग्रामस्थ, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटनांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सौ. शुभांगीताई पवार या शेतकरी विकास पॅनेलच्या सक्रिय प्रतिनिधी म्हणून ओळखल्या जातात. ग्रामविकास, पारदर्शक प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली धावडशी ग्रामपंचायतीच्या विकासकामांना अधिक गती मिळेल, तसेच पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि कृषीविकास यांसारख्या क्षेत्रांत प्रभावी कामे होतील, अशी अपेक्षा या निवडीवेळी माजी सरपंच संदीपभाऊ साहेबराव पवार यांनी व्यक्त केली आहे.

उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर शुभांगीताई पवार यांनी ग्रामस्थांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “ही जबाबदारी माझ्यासाठी सन्मानासोबतच मोठी जबाबदारी आहे. सर्वांना विश्वासात घेऊन धावडशी गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करेन,” असेही त्यांनी यावेळी सांगितले.

त्यांच्या निवडीबद्दल धावडशी गावातील नागरिक, शेतकरी विकास पॅनेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शुभेच्छुकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

तसेच या निवडीवेळी जिप सदस्य सर्जेराव सावंत, अजिंक्यतारा कारखान्याचे व्हा. चेअरमन नामदेवराव सावंत, पंचायत समिती सभापती महेश गाडे, माजी सभापती सरिताताई इंदलकर, अरुण कापसे, पंचायत समिती सदस्य प्रभाकर पवार, सरपंच अरुण कारंडे, चैतन्य नवाथे, राजेंद्र पवार, नंदकुमार पवार, बाळू शिंदे, अरुण पवार, दीपक पवार, प्रताप पवार, सुरेश महाजन, मंगल ढेंबे, यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket