अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » वनविभागामार्फत ‘हरित वारी वृक्षदिंडी’ संपन्न

वनविभागामार्फत ‘हरित वारी वृक्षदिंडी’ संपन्न

वनविभागामार्फत ‘हरित वारी वृक्षदिंडी’ संपन्न

सातारा प्रतिनिधी -सातारा वनविभाग सातारा (प्रा). सामाजिक वनीकरण विभाग सातारा, सह्याद्री व्याघ्र राखिव (वन्यजीव) स्थित कराड. कुंडल वनअकादमी कुंडल यांच्या संयुक्त विद्यमाने हरितवारी वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. वनविभागाद्वारे सन २०१९ पासुन हरितबारी वृक्षदिंडीची सुरुवात केली असून २०२६ ची ही ७ वी वृक्षदिंडी साजरी करण्यात आली.

या हरित वारीची सुरुवात तरडगाव मधुन मा. श्रीमती श्रीलक्ष्मी. ए. (मुख्य वनसंरक्षक प्रा. कोल्हापूर) यांचे हस्ते करण्यात आली. याप्रसंगी मा.श्री. अमोल सातपुते (उपवनसंरक्षक सातारा) मा.श्री. सागर गवते (उपवनसंरक्षक प्रा. सांगली). मा.श्री मिलिश शर्मा (उपवनसंरक्षक प्रा. सावंतवाडी). मा.श्री. हरिश्चंद्र वाघमोडे (प्रशासकिय व व्यवस्थापक कुंडल अकादमी), मा. श्रीमती रेश्मा व्होरकाटे (विभागीय वनअधिकारी सामाजिक वनीकरण विभाग सातारा), मा. श्री. भरत शिंदे (अप्पर संचालक प्रशासन, कुंडल). संजय वाघमोडे (विभागीय वन अधिकारी दक्षता विभाग कोल्हापूर). मा. श्री. महेश झांजुणें (विभागीय वनअधिकारी वनविभाग जळगाव) तसेच ३५० वनअधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तरडगाव ते सुरवडी १४ किमी पायी हरितवारी वृक्षदिंडी करण्यात आली असून त्यातून वनसंरक्षण व संवर्धनाविषयी जनजागृती करण्यात आली.

यावर्षीच्या वृक्षदिंडी सोहळ्यामधील नाविन्यपुर्ण उपक्रम मौजे काळज येथे हरितवारी वन’ चे उद्घाटन मा. श्रीमती श्रीलक्ष्मी. ए. (मुख्य वनसंरक्षक प्रा. कोल्हापूर) यांच्या हस्ते करण्यात आले. सदर बनाची निर्मिती मा.श्री. अमोल सातपुते. (उपवनसंरक्षक सातारा) यांच्या संकल्पनेतून करण्यात आली असून यामध्ये एकूण ३७५ पौराणिक व धार्मिक महत्त्व असणाऱ्या प्रजाती जसे की पिंपळ. उंबर. वड. कैलासपती. बेल. चाफा. आंबा इ. प्रजातीची लागवड करण्यात आली, यामध्ये संत ज्ञानेश्वर माउली पालखी महामार्ग हिरवागार करण्याच्या निश्चयाची सुरुवात वनविभागाकडून करण्यात आली. यावेळी वारकऱ्यांना पन्नास हजार सीडबॉल तसेच जंगली प्रजातीचे बियाणे वाटप करण्यात आले व पंढरपूरकडे जाताना रस्त्याच्या कडेला रुजविण्यास सांगण्यात आले. त्यातून निसर्ग संरक्षण व संवर्धनाप्रति वारकऱ्यांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच वनविभागाच्या विविध योजनांची माहिती पुस्तकांचे वाटप ही करण्यात आले.

राज्यातील पहिल्याच हरितवारी वनाची निर्मिती आणि वृक्ष दिंडीचे यशस्वी आयोजन याकरिता श्री. दिगंबर जाधव सहाय्यक वनसंरक्षक सातारा. श्रीमती. निकिता बोटकर वनपरिक्षेत्र अधिकारी फलटण (प्रा). श्री. विजय रामटेके वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण फलटण तसेच फलटण येथील वनरक्षक, वनपाल यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket