ॲड. निलेश डेरे मित्र परिवाराच्या वतीने पालखी सोहळ्यात लोणंदमध्ये वारकऱ्यांसाठी सेवाभावी उपक्रम
वाई प्रतिनिधी -आळंदी येथून प्रस्थान केलेल्या जगद्गुरू संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र पालखी सोहळ्याचे लोणंद नगरीत भक्तिमय वातावरणात आगमन झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने माऊलींच्या पालखीचे भावपूर्ण व भव्य स्वागत करण्यात आले.
वारकऱ्यांच्या सेवेत सहभागी होण्याचे भाग्य लाभावे या भावनेतून पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनोभावे सेवा केली. सुमारे १०,००० वारकऱ्यांना आवश्यक सेवांचे वाटप करण्यात आले. ही सेवा करण्याची संधी मिळणे, हे आम्हा सर्वांसाठी मोठे भाग्य व समाधानाचे क्षण होते असे कार्यकर्त्यांनी नमूद केले.
या सेवाकार्यात श्री. तेजपाल वाघ, सौ. अर्चना ताई देशमुख, सौ. समिंद्द्रा ताई जाधव, श्री. संतोष पवार, श्री. सोमनाथ जाधव, श्री. दत्तात्रय पवार, श्री. देशमाने,श्री.प्रमोद साळुंखे, श्रीमती अंबवडे ताई, श्री. संग्राम कदम आणि श्री. अक्षय जाधव यांनी मोलाचे सहकार्य करत वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली.या पवित्र सेवाकार्यात योगदान देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे युवा नेते एडवोकेट निलेश डेरे यांनी मनःपूर्वक आभार मानले.उपक्रमाचे नियोजन ॲड.निलेश डेरे मित्र परिवार तफे करण्यात आले होते.





