अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » देश » धार्मिक » विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम

विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम

विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम

सातारा, दि.१५: विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने पंढरीकडे धावणाऱ्या वारकऱ्यांच्या थकलेल्या चरणांची सेवा आणि त्या माध्यमातून पुढे चालण्यास बळ देणारा चरण सेवा उपक्रम हजारो वारकऱ्यांचा थकवा दूर करून त्यांचे आशीर्वाद घेत आहे. 

आषाढी वारीदरम्यान पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांना मोफत आरोग्यसेवा आणि चरणसेवेचा लाभ मिळावा, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील ‘चरणसेवा’ उपक्रम यंदाही राबविण्यात येत आहे. 

या वर्षीही सेवा केंद्रांवर डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय विद्यार्थी आणि स्वयंसेवक कार्यरत असून, औषधी आयुर्वेदिक तेल, रुग्णवाहिका यासह सेवा करण्यात येत आहे.आज जर्मन टेन्ट, तरडगाव रोड, बाळूपाटलाची वाडी येथे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातर्फे चरणसेवा उपक्रमात आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी १४७० वारकऱ्यांच्या, संजीवन नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी १५५० वारकऱ्यांच्या, महालक्ष्मी नॅचरोपॅथी कॉलेज रायगावच्या विद्यार्थ्यांनी १५७५ वारकऱ्यांना,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय साताराच्या विद्यार्थ्यांनी ४४० वारकऱ्यांना पायाला तेल लावून मसाज करत चरण सेवा दिली. तर २२८ वारकऱ्यांचे ड्रेसिंग केले. यशवंत आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ७६० वारकऱ्यांना चरण सेवा दिली. बाह्य रुग्ण विभागाने ३६० वारकऱ्यांची तपासणी केली व औषधोपचार केले.

जिज्ञासा आणि आखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांनी

१६८० चरण सेवा दिली. बाह्य रुग्ण विभागाने ३८० वारकऱ्यांवर औषध उपचार केले. जीपी असोसिएशन सातारा यांच्याकडून जनता अर्बन बँक येथे मोफत उपचार शिबिर आयोजित करण्यात आले यात ५२० रुग्णांनी लाभ घेतला. आज दिवसभरात ७४७५ वारकऱ्यांची चरण सेवा करण्यात आली.

बाह्य रुग्ण विभागा मार्फत १२६० वारकऱ्यांची तपासणी करण्यात आली. २८० वारकऱ्यांना ड्रेसिंग करण्यात आले. यामध्ये २१५ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. मुख्यमंत्री सहायता कक्षामार्फत राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचा वारकऱ्यांना लाभ होत असून त्यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे अशी माहिती या कक्षाचे समन्वयक डॉ. रविराज निकम यांनी दिली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket