गौरीशंकर मध्ये थेट द्वितीय वर्ष बी. फार्मसी साठी शासनमान्य अधिकृत सुविधा केंद्र सुरू.
लिंब-दर्जात्मक व गुणात्मक शिक्षणातून औषध निर्माण क्षेत्रात सक्षम समाज निर्मिती घडविणाऱ्या व विविध स्पर्धात्मक स्पर्धेत विशेषता संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँन्ड रिसर्च, लिंब या महाविद्यालयातील शैक्षणिक गुणवत्तेच्या परंपरेची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामायिक प्रवेश प्रक्रिया कक्षाने (सी.ई.टी. मुंबई) या महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष सन २०२६-२७ साठी थेट द्वितीय वर्ष बी. फार्मसी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची कागदपत्रे पडताळणी केंद्रास मान्यता दिली आहे. या सुविधेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष बेल्हेकर यांनी कळविले आहे. प्रवेश प्रक्रिया वेळेत अर्ज भरणे. कागदपत्रांची पडताळणी साठी शासनाने दिनांक ८ जुलै ते १८ जुलै पर्यंत मुदत दिली आहे. या संधीचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश अर्ज वेळेत भरून प्रवेश निश्चित करावा असे आव्हान महाविद्यालय कडून करण्यात आले आहे.




