अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » यशोदा टेक्निकल कॅम्पसचे शारीरिक शिक्षण संचालक अजितसिंह भोसले यांना पीएच.डी. पदवी प्रदान

यशोदा टेक्निकल कॅम्पसचे शारीरिक शिक्षण संचालक अजितसिंह भोसले यांना पीएच.डी. पदवी प्रदान

यशोदा टेक्निकल कॅम्पसचे शारीरिक शिक्षण संचालक अजितसिंह भोसले यांना पीएच.डी. पदवी प्रदान

सातारा : यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशोदा टेक्निकल कॅम्पस, सातारा येथील शारीरिक शिक्षण संचालक अजितसिंह सूर्यकांत भोसले यांना बीटीयू विद्यापीठ, मणिपूर येथून पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला.

अजितसिंह भोसले यांनी डॉ. संदीपराज शशिकांत औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली “शाळा व प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या शालेय स्तरावरील खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या बायोमेकॅनिक्सच्या मूलभूत व्यावहारिक ज्ञानाचा प्रभावी क्रीडा कौशल्य विकासासाठी अभ्यास व त्याची आवश्यकता” या विषयावर संशोधन करून पीएच.डी. पदवी संपादन केली. या संशोधनामध्ये शालेय स्तरावरील खेळाडूंना प्रशिक्षणादरम्यान बायोमेकॅनिक्सचे ज्ञान कितपत दिले जाते, त्याचा खेळातील कौशल्य विकासावर होणारा परिणाम तसेच प्रशिक्षण पद्धती अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक सुधारणा यांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ सगरे, उपाध्यक्ष डॉ. अजिंक्य सगरे यांनी अजितसिंह भोसले यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक, संशोधनात्मक व व्यावसायिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. संशोधन संस्कृतीला चालना देणे आणि शिक्षकांनी उच्च शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञाननिर्मितीत योगदान देणे ही संस्थेची भूमिका असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. यावेळी डॉ.गणेश सुरवसे, डॉ. रणधिरसिंह मोहिते हे देखील उपस्थित होते.

अजितसिंह भोसले हे यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने कार्यरत असून विविध क्रीडा स्पर्धा, फिटनेस उपक्रम आणि आरोग्यविषयक कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करत आहेत. त्यांचे संशोधन क्रीडा प्रशिक्षण क्षेत्रासाठी उपयुक्त ठरणारे असून प्रशिक्षक, शारीरिक शिक्षण शिक्षक आणि खेळाडूंना अधिक वैज्ञानिक पद्धतीने प्रशिक्षण देण्यासाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

अजितसिंह भोसले यांच्या पीएच.डी. पदवीमुळे यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या संशोधन परंपरेत आणखी एका यशाची भर पडली असून संस्थेतील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसाठी हे प्रेरणादायी ठरणार आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेतील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी तसेच क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket