अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चाटे शिक्षण समूहाचा ‘गुणवंत विद्यार्थी सत्कार व Student-Parent Orientation Program’ उत्साहात संपन्न

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चाटे शिक्षण समूहाचा ‘गुणवंत विद्यार्थी सत्कार व Student-Parent Orientation Program’ उत्साहात संपन्न

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चाटे शिक्षण समूहाचा ‘गुणवंत विद्यार्थी सत्कार व Student-Parent Orientation Program’ उत्साहात संपन्न

सातारा, दि. ११ जुलै : चाटे शिक्षण समूह, सातारा यांच्या वतीने इयत्ता सातवी ते दहावी तसेच अकरावी (सायन्स) मधील विद्यार्थी व पालकांसाठी आयोजित ‘गुणवंत विद्यार्थी सत्कार व Student-Parent Orientation Program’ हा कार्यक्रम मा. यशवंतराव चव्हाण सभागृह, सातारा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी चाटे शिक्षण समूह सातारा जिल्हा प्रमुख प्रा. राजेंद्र घुले सर यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करत विद्यार्थी आणि पालकांनी शिक्षणाबाबत योग्य दृष्टीकोन ठेवण्याचे महत्त्व विशद केले.

यावेळी कोल्हापूर विभागाचे संचालक प्रा. डॉ. भारत खराटे सर यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, ध्येयनिश्चिती, स्पर्धात्मक युगातील संधी आणि यशाचा मंत्र याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कोल्हापूर विभागाचे शैक्षणिक मार्गदर्शक मधुकर पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये पालकांची भूमिका, सकारात्मक वातावरण आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमास सानप सर, ससाणे सर,डोईफोडे सर तसेच चाटे शिक्षण समूहाचे माजी विद्यार्थी डॉक्टर कुणाल टंगसाळे यांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा.रंजना जाधव यांनी केले.

विद्यार्थी आणि पालकांना शिक्षण, करिअर नियोजन व उज्ज्वल भविष्यासाठी दिशा देणारा हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी चाटे शिक्षण समूहाच्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket