सक्सेस ॲबॅकसला नॅशनल एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड’ हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
सातारा :- दिल्ली येथे आयोजित ‘भारत निर्माण कॉन्क्लेव्ह २०२६’ या कार्यक्रमात सातारा येथील सक्सेस ॲबॅकस अँड एज्युकेशन इंडिया प्रा. लि. या संस्थेला शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट योगदाना बद्दल केंद्रीय रस्ते व वाहतूक महामार्ग मंत्री मा. नितीन गडकरी यांच्या हस्ते नॅशनल एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड’ देऊन गौरवण्यात आले. हा पुरस्कार सक्सेस ॲबॅकस संस्थेचे चेअरमन श्री. किरण पाटील यांनी स्वीकारला. सक्सेस ॲबॅकस साठी हा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार असून, संस्थेच्या १२ वर्षांच्या शैक्षणिक प्रवासातील हा अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानास्पद टप्पा आहे.
गेल्या १२ वर्षांपासून सक्सेस ॲबॅकस विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण बौद्धिक विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे. विद्यार्थ्यांमध्ये गणिताची भीती दूर करून जलद आणि अचूक गणित सोडविण्याची क्षमता, स्मरणशक्ती, एकाग्रता, तार्किक विचारशक्ती आणि आत्मविश्वास वाढविण्याचे कार्य संस्थेमार्फत केले जात आहे. आज महाराष्ट्रासह देशभरात ५५० हून अधिक फ्रँचायझी केंद्रांच्या माध्यमातून ५० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सक्सेस ॲबॅकसच्या कोर्सचा लाभ घेतला आहे.
संस्थेचे चेअरमन व एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर किरण प्रकाश पाटील यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना सांगितले की, “हा राष्ट्रीय सन्मान केवळ सक्सेस ॲबॅकसचा नसून, आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी, पालक, फ्रँचायझी धारक, शिक्षक आणि संपूर्ण ऑफिस टीमच्या एकत्रित प्रयत्नांचा गौरव आहे. हा पुरस्कार आम्हाला अधिक जोमाने आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रेरणा देणारा आहे.”
या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल विद्यार्थी, पालक, फ्रँचायझी धारक, शिक्षक, हितचिंतक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सक्सेस ॲबॅकसचे अभिनंदन केले असून, महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी हा सन्मान अभिमानाची बाब असल्याची भावना व्यक्त केली आहे.





