नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » देश » धार्मिक » जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शन

जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शन

जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शन

वारकरी, शेतकऱ्यांना सुखी ठेव; मुख्यमंत्र्यांचे विठुराया चरणी साकडे

पुणे: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात आषाढी वारीमध्ये सहभागी होणे अतिशय सुंदर अनुभूती आहे; महाराष्ट्राच्या या परंपरेतून असीमित ऊर्जा मिळते, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुका आणि श्री निवडुंगा विठोबाचे दर्शन घेतल्यानंतर व्यक्त केली. वारीत सहभागी झालेले वारकरी आणि शेतकऱ्यांना सुखी ठेव, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठुराया चरणी घातले.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार हेमंत रासणे, महापौर मंजुषा नागपूरे, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, पुणे शहरचे पोलीस सहआयुक्त संजय दराडे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. गणेश महाराज मोरे, ह.भ.प वैभव महाराज मोरे, ह.भ.प दिलीप महाराज मोरे, विश्वस्त ह.भ.प. विक्रमसिंह मोरे, ह.भ.प.उमेश महाराज मोरे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज मोरे, श्री निवडुंगा विठोबा देवस्थान संस्थानचे अध्यक्ष हिरालाल मालू, स्थानिक लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री. तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद प्राप्त केलेला आहे. संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पुणे शहरातील पालखीच्या ठिकाणी असणाऱ्या अडीअडचणी पुणे महानगरपलिकेने योग्य पद्धतीने दूर केल्या आणि सुविधांचा विस्तार केला. पुढच्या वर्षी यामध्ये आणखीन विस्तार करण्यात येईल.

वारकऱ्यांनी वारीचा आनंद घेत सुखरूप पंढरपूर येथे पोहचावे, असे आवाहन करुन मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही वारी अतिशय सुखरुपपणे पूर्ण व्हावी, अशी प्रार्थना विठुरायाच्या चरणी केली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket